आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाळणीत दुरावलेले भाऊ तब्बल 74 वर्षांनंतर भेटले:भेटीदरम्यान दोन्ही भावांना अश्रू अनावर, हे पाहून पाकिस्तानी रेंजर्सही झाले भावूक

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही भावांच्या भेटीसाठी सोशल मीडिया हे माध्यम ठरले.

1947 ला भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, त्यावेळी एकमेकांपासून दुरावलेले दोन भाऊ अखेर बुधवारी भेटले आहेत. या दोन भावंडांच्या भेटीचा भाविनक क्षण बघताना तेथे उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. पाकिस्तानातील फैसलाबाद येथे मोहम्मद सदीक राहतात. तर त्यांचा मोठे बंधू मोहम्मद हबीब आका उर्फ शैला हे भारतातील पंजाबमधील फुलनवाल या ठिकाणी राहतात. सदीक हे पाकिस्तनातून आपल्या मोठ्या भावाची भेट घेण्यासाठी आले होते. करतारपूरमध्ये दोघांची भेट झाली.

दोन्ही भावांच्या भेटीसाठी सोशल मीडिया हे माध्यम ठरले. दोघांची पहिली भेट या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर झाली होती, आणि आता हे एकमेकांना समोरासमोर भेटले. सुरुवातीला दोघेही मिठी मारून ढसाढसा रडले, नंतर त्यांनी एकमेकांचे अश्रू पुसले. हबीब यांनी त्यांचे भाऊ सिदीक यांना सांगितल्यानुसार, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आईच्या सेवेत वाहून घेतले. त्यांनी लग्नही केले नाही.

पाकिस्तानातील फैसलाबाद येथे राहणारे मोहम्मद सादिक आणि भारतातून करतारपूर साहिब येथे पोहोचलेले मोहम्मद हबीब आका उर्फ शैला यांच्या भेटीने सर्वांनाच भावूक केले.
पाकिस्तानातील फैसलाबाद येथे राहणारे मोहम्मद सादिक आणि भारतातून करतारपूर साहिब येथे पोहोचलेले मोहम्मद हबीब आका उर्फ शैला यांच्या भेटीने सर्वांनाच भावूक केले.

करतारपूर कॉरिडॉर हा पाकिस्तानला भारताच्या सीमेशी जोडणारा भाग आहे. फाळणीच्या वेळी सादिक हे लहान होते. फाळणीदरम्यान, सादिक हे पाकिस्तानात गेले आणि त्यांचा मोठा भाऊ हबीब हे भारतात आले. तब्बल 74 वर्षानंतर या दोन भावंडांची भेट झाल्याने हा एक भावनिक क्षण होता. यावेळी दोघांनी एकमेकांना मिठी मारुन आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी दोघांनांही अश्रू अनावर झाले. या भेटीदरम्यान, हबीब यांनी करतारपूरच्या उपक्रमाचे कौतुक केले. कॉरिडॉर सुरू केल्याने मला माझ्या भावाशी पुन्हा भेटायला मिळाले असे हबीब यांनी सांगितले.

कॉरिडॉरमध्ये पाऊल ठेवताच भेटीसाठी आलेल्यांना पहिली सूचना दिली जाते ती म्हणजे भारतीय कोणत्याही पाकिस्तानीशी बोलणार नाही किंवा नंबरची देवाणघेवाण करणार नाहीत. कॉरिडॉरवर एखादा भारतीय पाकिस्तानशी बोलताना दिसला तरी पाक रेंजर्स त्यांना अडवतात, पण, या दोन भावांच्या भेटीचे दृश्या पाहून यावेळी पाक रेंजर्सही भावूक झाले. आणि दुपारी 4 वाजेपर्यंत या दोन भावांना वेगळे करण्याचे धाडस कोणी केले नाही.

ही भेट अतिशय हृदयस्पर्शी होती: सीईओ
करतारपूर कॉरिडॉर प्रकल्पाचे सीईओ मोहम्मद लतीफ यांनी सांगितले की, जेव्हा दोन्ही भावांनी एकमेकांना मिठी मारली तेव्हा दोघांच्याही रडण्याचा आवाज आला. हा क्षण अतिशय भाविनक होता. एका दिवसात 5000 भारतीयांना करतारपूर साहिब येथे आणण्याची व्यवस्था आहे, परंतु सध्या ही संख्या 200 पेक्षा कमी आहे.

सुनीता देवी 43 वर्षांनंतर पाकिस्तानात आपल्या नातेवाईकांना भेटल्या.
सुनीता देवी 43 वर्षांनंतर पाकिस्तानात आपल्या नातेवाईकांना भेटल्या.

व्हिसाच्या अडचणीमुळे आप्तेष्ट भेटीसाठी येथे येतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने नोव्हेंबर 2019 मध्ये करतारपूर कॉरिडॉर उघडण्याचा निर्णय घेतला होता. 4.7 किलोमीटर लांबीचा हा करतारपूर कॉरिडॉर आहे. मात्र, नंतरच्या काळात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला. त्यामुळे खबरदारी म्हणून हा कॉरिडॉर बंद करण्यात आला होता. आता हा कॉरिडॉर पुन्हा सुरु करण्यात आला आहे.

फाळणीच्या वेळी दुरावलेले लोक आपल्या नातेवाईंकांना येथे भेटण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी अज्जोवाल होशियापूर येथील सुनीता देवी आपल्या कुटुंबासह करतारपूरला गेल्या आणि नातेवाईकांना भेटल्या होत्या. फाळणीच्या वेळी सुनीता यांचे वडील भारतातच राहिले होते आणि बाकीचे कुटुंब पाकिस्तानात गेले होते. त्याचप्रमाणे अमृतसरचे जतिंदर सिंग आणि हरियाणाच्या मनजीत कौर आपल्या ऑनलाइन मित्रांना भेटण्यासाठी करतारपूरला आल्या होत्या. मात्र, त्या दोघांना पाकिस्तान रेंजर्सनी परत पाठवले होते.

बातम्या आणखी आहेत...