आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एशिया कप:श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात चार गडी राखून श्रीलंका विजयी ; 19.1 षटकात पुर्ण केले लक्ष

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त अरब अमिरात येथील शारजाह येथे सुरु असलेल्या आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेने अफगाणिस्तानचा चार गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात लंकेसमोर 176 धावांचे लक्ष ठेवले होते. परंतु श्रीलंकन फलंदाजानी चांगली कामगिरी करत 19.1 षटकात धावसंख्या पुर्ण केली.त्याआगोदर अफगाणिस्तान कडुन फलंदाजी करत असताना रहमानउल्ला गुरबाजने 84 तर इब्राहिम झद्राननेही 40 धावांची खेळी खेळली.यामुळेच अटितटीच्या या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 20 षटकांत 6 बाद 175 धावा ते करु शकले. सुरुवातीला हजरतुल्ला झाझाई स्वस्तात बाद झाल्यानंतर रहमानउल्ला आणि इब्राहिम यांनी दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने 37 धावांत 2 तर महेश थेक्षाना आणि असिथा फर्नांडोने प्रत्येकी एक बळी घेतला.

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन) : हजरतुल्ला झाझाई, रहमानउल्ला गुरबाज (विकेट कीपर), इब्राहिम झद्रान, मोहम्मद नबी (कप्तान), नजीबुल्ला झद्रान, करीम जनात, समीउल्ला शिनवारी, रशीद खान, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन) : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेट कीपर ), चारिथ असालंका, दानुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शानाका (कप्तान), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशानका

बातम्या आणखी आहेत...