आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kashmiri Pandit Murder : The Leaders Have You Guns, The Father Gave Me The Weapon Of Education

श्रीनगर:नेत्यांनी तुमच्या हातात बंदुका दिल्या, वडिलांनी मला शिक्षणाचे शस्त्र दिले

जम्मू/श्रीनगर (मोहित कंधारी/हारुण रशीद)10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीनगरात काश्मिरी पंडित व्यापाऱ्याच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी मुलीचे अतिरेक्यांना आव्हान

श्रीनगरमध्ये मंगळवारी बंदूकधाऱ्यांच्या गोळीबारात ठार माखनलाल बिंद्रू यांच्या घरी बुधवारी सकाळपासूनच लाेकांची मोठी गर्दी जमली. प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करू पाहत होता. हफ्त चिनार चौकपासून जहांगीर चौकापर्यंतच्या (येथे माखनलाल यांचे दुकान होते) मार्गाला शहीद माखनलाल बिंद्रू रोड नाव देण्यात आले आहे. बिंद्रू काश्मिरातील सर्वात प्रतिष्ठित केमिस्ट्सपैकी एक होते. ते काश्मिरी पंडित समाजाचा प्रमुख चेहरा होते.

बुधवारी अंत्यसंस्कारापूर्वी त्यांची कन्या श्रद्धा बिंद्रूने वडिलांच्या मारेकऱ्यांना खुले आव्हान दिले. त्या म्हणाल्या, त्यांच्याकडे बंदुका आहेत तर माझ्याकडे वडिलांनी दिलेले शिक्षणाचे शस्त्र आहे. माखनलाल यांचे पुत्र डॉ. सिद्धार्थ बिंद्रू म्हणाले, ९० च्या दशकापासून माझ्या वडिलांना माहीत हाेते की काश्मिरात कायम त्यांच्या जिवाला धोका असेल. मात्र त्यांनी कधीच त्याची पर्वा केली नाही. एका सुरक्षा तज्ज्ञाने सांगितले की, यंदा खोऱ्यात अनेक अतिरेकी कमांडर्सना टिपण्यात आले आहे. यामुळे अतिरेकी संघटना दबावात आहेत. त्या सुरक्षा दलांवर हल्ला करण्याच्या स्थितीत नाहीत. यामुळे त्या सॉफ्ट टार्गेटच्या शोधात असतात.

श्रीनगरात माखनलाल बिंद्रू यांच्या हत्येने पुन्हा एकदा खोऱ्यात काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बिंद्रूंची हत्या, ही अशा पद्धतीची पहिलीच घटना नाही. जानेवारी २०२१ पासून आजवर जम्मू-काश्मीरच्या विविध जिल्ह्यांत किमान ५ काश्मिरी पंडित व परप्रांतीयांच्या हत्या झाल्या आहेत. यात इनमें राजकीय कार्यकर्ते, पोलिस व व्यावसायकांचा समावेश आहे. यातला समान धागा म्हणजे, हे सर्व अतिरेक्यांच्या निशाण्यावर असतानाही प्रदीर्घ काळापासून खोऱ्यात राहत होते.

सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, अतिरेक्यांना सामान्य स्थिती रूचत नाही. कलम ३७० रद्द झाल्यानंतर सुरक्षेची स्थिती सामान्य राहिली, जी त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. येथे बिगर काश्मिरींना वसवण्याच्या मुद्द्यावर स्थानिक पक्ष येथील डेमोग्राफी बिघडण्याचा मुद्दा मांडत आहेत. पाकिस्तानही यूएनमध्येच हेच तुणतुणे वाजवत आहे. स्थानिक पक्षांना कलम ३७० हटवणे व बिगर काश्मिरींना येथे वसवल्याचा धोका वाटत आहे. हे रोखण्यासाठी दहशतवादी संघटनाही सर्वसामान्यांवर हल्ले करत आहेत. काश्मीरात प्रगती व विकास अतिरेक्यांना खुपत आहे. आता पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. अशा घटनांनी पर्यटक घाबरतील, असे अतिरेक्यांना वाटते. पर्यटनाला फटका बसल्यास काश्मीरात सर्वकाही आलबेल नाही, असे भासवण्यात अतिरेकी यशस्वी होतील. यापूर्वी कुलगाम जिल्ह्यात बंटु शर्मा या काश्मिरी पंडित पोलिसाची अतिरेक्यांनी हत्या केली होती. २ जूनला पुलवामाच्या त्रालमध्ये भाजपचे नगरसेवक राकेश पंडितांना गोळी मारण्यात आली. १७ फेब्रुवारीला श्रीनगरच्या ढाबा मालकाचा मुलगा आकाश मेहराला अतिरेक्यांनी ठार केले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पंजाबहून श्रीनगरमध्ये स्थायिक झालेले प्रख्यात ज्वेलर सतपाल निश्चल यांचीही हत्या झाली.

तुम्ही मनुष्याला संपवू शकता, त्याच्या जिद्दीला नाही...माझ्या बाबांची जिद्द अमर राहील
ज्याने माझ्या बाबांना गोळी मारली आहे, मी त्याला आव्हान देते. त्याने माझ्यासमोर यावे. नेत्यांनी तुमच्या हाती बंदुका व दगड दिले, तर माझ्या वडिलांनी मला शिक्षण दिले आहे. तुम्ही बंदुका व दगडांनी लढू इच्छिता? हा भ्याडपणा आहे. सर्व नेते तुमचा वापर करत आहे... चला, लढायचे असेल तर शिक्षणाला शस्त्र बनवा. मी आज असोसिएट प्रोफेसर आहे, मी शून्यातून सुरुवात केली होती. बाबांनी सायकलीपासून सुरुवात केली होती. माझा भाऊ प्रसिद्ध एंडोक्रायनोलॉजिस्ट अाहे, आईही दुकानात बसायची... आम्हाला माखनलाल बिंद्रूंनी घडवले आहे. मी हिंदू अाहे, पण मी कुराण वाचले आहे. कुराण म्हणते - तुम्ही व्यक्तीला मारू शकता, त्याच्या जिद्दीला नाही. माखनलाल यांची जिद्द अमर राहील. ते नेहमी म्हणायचे, मी तर काम करता करताना मरेन.

बातम्या आणखी आहेत...