आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:श्रीनगर-सोनमर्ग, मनाली-लेह मार्ग आधी सुरू होणार! लडाखमध्ये तैनात सैन्य तुकडीच्या रहदारीसाठी उत्तम पर्याय

जम्मूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक वर्षात बांधकाम कार्य, बर्फ हटवताना २०० हून जास्त लोकांनी गमावले प्राण

बीआरओ काश्मीर व लडाखमधील रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या महामार्गावरील बर्फ हटवणे, नवे मार्ग, पूल तयार करण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या श्रीनगर-साेनमर्ग तसेच गुमरी व मनाली-लेह मार्गावरील बर्फ हटवण्याचे काम बीआरआेने सुरू केले आहे. लडाखमधील तैनात लष्करी तुकडीला वाहतूक करण्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. गेल्या वर्षी १८ मे राेजी हा मार्ग सुरू झाला हाेता. मुदतीच्या एक महिना आधी ताे तयार हाेता. यंदा दाेन महिने आधी हा मार्ग खुला करण्याचे काम सुरू आहे. हा मार्ग जगातील सर्वात उंच खिंडींतून जाताे. संसाधनांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ते याेग्य ठिकाणी सज्ज ठेवले आहेत.

बीआरआेला दाेन हिमवादळात अडकल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. १५ ते २० फूट उंच बर्फाच्छादित मार्गांवरून जाताना टीमने २ दिवसात २० किमींचा प्रवास केला. बीआरआेसमाेर महामार्गावर अनेक समस्या असताना गेल्या वर्षी बीआरआेने जाेजिला-कारगिल व लेह महामार्गाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत सुरू ठेवले. त्यामुळेच या दरम्यान ११ हजार ६५० फूट उंचीवरील जाेजिलातून लष्कर तसेच सामान्य नागरिकांच्या चार हजार वाहनांची साेय हाेऊ शकली. त्यानंतर दाेन-तीन महिन्यांत ६ मार्चला ते सुरू झाले. लवकरच मार्ग सर्वांसाठी खुले केले जाणार आहे.

३ प्रकल्पांतर्गत १५५० किमी लांब रस्त्यावरून बर्फ हटवण्यास सुरुवात

भारत-चीनसह सीमेवर इतर ८ पूल तयार हाेणार
आगामी वर्षांत भारत-चीन सीमेसह इतर सरहद्दीसाठी महत्त्वाचे ठरणारे डी-एस-डीबीआे मार्ग, फाेबरांग, मर्शिमी कला, हाटस्प्रिंग, चिशुम्ले-डॅमचाॅक मार्ग इत्यादी ठिकाणी या वर्षी बीआरआे मार्ग व एकूण आठ पूल तयार हाेतील. काही महत्त्वाचे पूल लवकरच वाहतुकीसाठी सज्ज हाेतील. श्रीनगर-बारामुल्ला-उरी सामाईक छावणी मार्गावरही लवकरच दाेन पूल तयार हाेतील.

विजयक प्रकल्प : ९८३ किमी लांबीचा हा मार्ग आहे. लडाखमध्ये लेह व कारगिलला जाेडते. त्यात ३७१ किमी लांबीच्या मार्गावरून बर्फ हटवण्याचे काम सुरू आहे. हे मार्ग डाेंगरावरील शिखरावर आहेत. कारू-तांग्शे, हाेराेंग चुसुल, उपशी-सारचू या मार्गावरील बर्फ हटवण्याचेही काम करत आहेत.

बिकन प्रकल्प : ज्वाहर बाेगदा, जाेजिला पास काश्मीर खाेऱ्याला लडाखशी जाेडतात. त्यावरील बर्फ हटवण्याचे काम सैनिक करतात. या प्रकल्पाअंतर्गत जम्मू-श्रीनगर, श्रीनगर-साेनमर्ग-गुमरी-लेह, बारामुला-कुपवाडा-चाैकीबल-तंगधरला जाेडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर काम करत आहे.

बातम्या आणखी आहेत...