आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • SRO Satellite EOS 01 Launch Sriharikota | ISRO Earth Observation Satellite EOS 01 Launch Today News

दिवाळीआधीच ISRO चे रॉकेट:यावर्षीची ISRO ची पहिली लॉन्चिंग यशस्वी, रडार इमेजिंग उपग्रहासह 10 उपग्रह एकत्रा अंतराळात पाठवले

श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश)9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ISROची ही 51वी मोहीम होती, या उपग्रहामुळे सैन्य पाळत ठेवण्यास होणार मदत

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून शनिवारी रडार इमेजिंग उपग्रह EOS01ची लॉन्चिंग केली. PSLV-C49 रॉकेटद्वारे देशाच्या रडार इमेजिंग उपग्रहासोबतच 9 विदेश उपग्रह अंतराळ सोडण्यात आले. लॉन्चिंगच्या निश्चित वेळेत (3 वाजून 2 मिनिटे) 10 मिनिटे उशिरा झाला.

यावर्षी ही इस्त्रोची पहिली लाँचिंग होती. याचवर्षी 17 जानेवारी रोजी ISRO च्या GSAT उपग्रह अंतराळ सोडण्यात आला होता. मात्र ही लॉन्चिंग फ्रेंच गुयाना येथून केली होती. ISRO चे चेअरमन डॉ. के सिवन यांनी EOS01च्या यशस्वी प्रक्षेपणावर ते म्हणाले की, दिवाळीआधीच रॉकेट लॉन्च केले, खरा उत्सव आता सुरू होईल. आम्ही वर्क फ्रॉम होममध्ये अंतराळाशी संबंधित काही गोष्टी करू शकत नाहीत. आपला प्रत्येक इंजीनिअर प्रयोगशाळेत उपस्थित असतो. जेव्हा आपण एखाद्या मोहिमेविषयी चर्चा करत तेव्हा प्रत्येक तंत्रज्ञ, कर्मचारी सोबत काम करतात.

रात्री सैन्य पाळत ठेवता येईल

रडार इमेजिंग उपग्रहाचा सिंथेटिक अपरेचर रडार ढगांच्या आरपारही पाहू शकतो. हा दिवस-रात्र आणि प्रत्येक वातावरणात फोटो घेऊ शकतो. याद्वारे आकाशातून शत्रू राष्ट्रांच्या हालचाली टिपण्यास मदत होणार आहे. यासह, शेती-वनीकरण मातीतील ओलावा शोधणे आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये देखील याची मदत होईल.

मोदी म्हणाले- कोरोनाची आव्हाने असूनही आमच्या शास्त्रज्ञांनी वेळेवर काम केले

चंद्रयान -2 नंतर चौथे आणि इस्रोकडून तिसरे प्रक्षेपण

मिशनतारीखलॉन्चिंग स्टेशन
Chandrayaan-222 जुलैISRO
Cartosat-327 नोव्हेंबर 2019ISRO
RISAT-4BR111 डिसेंबर 2019ISRO
GSAT-3017 जानेवारी 2020फ्रेंच गुयाना
EOS017 नोव्हेंबर 2020ISRO

शनिवारच्या लॉन्चिंगसोबत ISROच्या विदेश उपग्रह पाठवण्याचा आकडा 328 झाला आहे. हे ISROचे 51 वी मोहिम होती. ISRO ने आपली वेबसाइट, यूट्यूब चॅनेल, फेसबुक आणि ट्विटर पेजवर या लॉन्चिंगचे LIVE प्रक्षेपण देखील केले.

बातम्या आणखी आहेत...