आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Srujana, Municipal Commissioner Return To Duty With 22 Days Baby; Canceled Maternity Leave

जिद्दीची कथा:22 दिवसांच्या चिमुकल्यासह ड्यूटीवर परतल्या आयुक्त सृजना; रद्द केली मॅटर्निटी लिव्ह

विशाखापट्टणम3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • काेराेनाच्या आव्हानाला परतावून लावण्यासाठी विशाखापट्टणमच्या नगरपालिका आयुक्तांनी रद्द केली मॅटर्निटी लिव्ह
  • सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ पाणी आणि सेवा देण्यावर अधिक भर देतेय

बोमन्ना रेड्डी

काेराेना व्हायरसचा समूळ नायनाट करण्यासाठी भारतामध्ये युद्धपातळीवर माेहीम राबवली जात आहे. यासाठी अनेक याेद्धे आपली सेवा देत आहेत. यामध्येच आता विशाखापट्टणमच्या पालििका आयुक्त जी. सृजना यांची सेवा ही अधिकच लक्षवेधी आणि प्रेरणादायी ठरत आहे. प्रसूतीनंतर अवघ्या तीन आठवड्यांत त्यांनी कामावर परतण्याचा धाडसी निर्णय घेतला. काेराेनावर मात करण्यासाठी ड्यूटीवर परतलेल्या या आयुक्तांनी साेबत आपल्या २२ दिवसांच्या चिमुकल्यालाही आणले आहे. त्यामुळे त्याला आपल्या कुशीत घेऊन ही महिला आयुक्त सध्या निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. 

सध्या देशभरात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले. त्यामुळे या सर्वांच्या सेवेसाठी आयुक्त सृजना यांनी आपली सहा महिन्याची मॅटर्निटी लिव्ह (प्रसूतीनंतरची रजा) रद्द करण्याचे धाडस दाखवले. यासह सृजना या राेज कार्यालयात दाखल हाेऊन परिस्थितीचा आढावा घेत आहे. त्यामुळे त्यांच्या या कामावर काैतुकाचा वर्षाव केला जात आहे.

दर चार तासांनी घरी जाऊन मुलाला स्तनपान

भास्करसाेबत चर्चेत सृजना यांनी  सामाजिक कार्यासाठीच्या उत्साहाविषयीची माहिती दिली. यासाेबत कुटुंबीयांच्या जबाबदारीचेही पालन करत असल्याचे सांगितले. मुलगा हा २२ दिवसांचा आहे. त्यामुळे त्यालाही माझी माेठी गरज आहे. अशात त्याला स्तनपान करण्यासाठी मी दर चार तासांनी घरी जात हाेती. मात्र, असे असतानाही ताे कधी कधी रडत हाेता. रडल्यावर तत्काळ घरी जाणे शक्य नव्हते. त्यामुळेच मी त्याला कार्यालयातच साेबत आणले, असेही त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...