आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Srushti Goswami For Six Hours, The Chief Minister Of Uttrakhand Was Alerted About The Collapsing Bridges

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:सहा तासांसाठी सृष्टी झाली राज्याची मुख्यमंत्री, ढासळणाऱ्या पुलांबद्दल अधिकाऱ्यांना इशारा

डेहराडून / हिमांशू घिल्डियालएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सृष्टी गोस्वामीने राज्य सरकारच्या 13 विभागांचाही आढावा घेतला

उत्तराखंडात बालिका दिवसानिमित्त अनोखा प्रयोग करण्यात आला. हरिद्वारची विद्यार्थिनी सृष्टी गोस्वामीला एक दिवसाची मुख्यमंत्री करण्यात आले. तिने सर्व विभागांना अधिक चांगले काम करण्याचे निर्देश दिले. सहा तासांच्या कार्यकाळात ती आत्मविश्वासाने पूर्णपणे भरलेली दिसून आली. तसेच एका परिपक्व राजकीय नेत्याप्रमाणे विरोधकांच्या प्रश्नांचाही सामना केला. तिने राज्यातील सर्व जुने व जर्जर पूल नव्याने बनवण्याचे व त्याबाबत व्यापक सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. तिने रविवारी डेहराडूनच्या विधानसभा भवनात १३ विभागांच्या विकासकामांचा आढावा घेतला. सुरुवातीला बांधकाम विभागाने टिहरीत उभारलेल्या डोबरा चांटी पुलावर सादरीकरण केले.

गैरसैणला स्थायी राजधानी बनवण्याबाबतच्या प्रश्नावर तिने विरोधकांनाच पिंजऱ्यात उभे करत त्यांनी काहीच न केल्याचा आरोप करत सांगितले की, त्यांच्या सरकारनेच गैरसैणला राज्याची उन्हाळी राजधानी करण्याचा निर्णय घेतला. तसेच तेथे चहा विकास मंडळाचे मुख्यालयही स्थापन केले. काँग्रेसने यासाठी काहीच काम केले नाही. ती म्हणाली की, गैरसैणला राज्याची राजधानी करण्याचे येथील लोकांचे स्वप्न होते. मुलांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नाकारत तिने राज्य सरकारने नुकतेच डालनवाला येथे बाल मित्र ठाणे केल्याचा उल्लेख केला आणि सांगितले की, आम्ही एक कोटीचा चाइल्ड सेफ्टी फंडही उभारला आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक बालमित्र ठाणे स्थापन करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देशही तिने डीजीपींना दिले.