आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Staff Sent Pregnant Woman For Corona Test, Woman Gave Birth Delivery On The Way In Chhattisgarh

व्यवस्थेचा अमानवीय चेहरा:कर्मचाऱ्यांनी गरोदर महिलेला भरती करुन घेण्याऐवजी कोरोना चाचणी करण्यास पाठवले, वाटेतच झाली डिलीव्हरी

कोरबाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नंतर महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आली

हा फोटो छत्तीसगड राज्यातील कोरबा जिल्हा रुग्णालयातील आहे. येथून व्यवस्थेचा एक अमानवीय चेहरा समोर आला आहे. हॉस्पिटलमध्ये नकटीखारच्या रहिवासी असलेल्या गनेशिया बाई मंझवार (27)यांना सोमवारी प्रसव वेदना सुरू झाल्या. पती देवानंद मंझवार यांनी पत्नीला जिल्हा रुग्णालयातील मेटरनिटी वार्डात आणले. तिथे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी महिलेला भरती करुन घेण्याऐवजी कोरोना चाचणी करण्यास पाठवले.

यानंतर कुटुंबिय महिलेला घेऊन रुग्णालय परिसरात असलेल्या कोरोना चाचणी केंद्रावर दाखल झाले. यावेळी सकाळचे 8.30 वाजले होते आणि कोरोना चाचणी केंद्र 9 वाजता सुरू होणार होते. देवानंद यांनी सांगितले की, आम्ही कोरोना चाचणी करण्याच्या लाईनमध्ये लागताच पत्नीला प्रचंड वेदना सुरू झाल्या आणि काही मिनीटातच बाळाला जन्म दिला. यानंतर महिलेला एका व्हीलचेअरवरुन मेटरनिटी वार्डात नेण्यात आले.

नंतर महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला
या घटनेनंतर महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. यात आई आणि बाळाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. याप्रकरणी सिव्हिल सर्जन डॉ.अरुण तिवारी म्हणाले की, यापूर्वी अनेक गरोदर महिला पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यामुळेच कोरोना चाचणी गरजेची होती.

बातम्या आणखी आहेत...