आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बुधवारी आपला आमदार मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांना मंत्री केले. यासोबतच दक्षिण भारतात घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अण्णाद्रमुकने म्हटले की, ‘द्रमुकचे संस्थापक करुणानिधी यांचे कुटुंब राज्यातील सर्वात मोठे राजकीय कुटुंब बनले आहे. कुटुंबातील ७ सदस्य सक्रिय राजकारणात आहेत.’उदयनिधी हे तामिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी एंंटरटेनमेंट कंपनी रेड जाॅइंट मूव्हीजचे मालक तथा अभिनेते आहेत. गेल्या महिन्यात त्यांचा ‘कलगथलइवन’ चित्रपट रिलीज झाला. दुसरीकडे, तेलंगण, आंध्र व कर्नाटकच्या राजकारणातही घराणेशाहीचे वर्चस्व आहे. कर्नाटकात कुमारस्वामींचे अख्खे कुटुंबच पक्ष चालवत आहे.
तेलंगण-आंध्र
तेलंगणात सत्तारूढ भारत राष्ट्र समितीला एका कुटुंबाचा पक्ष म्हटले जाते. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या कुटुंबातील ५ सदस्य मोठ्या पदांवर आहेत. आंध्रात तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांनी आपला एकुलता एक मुलगा लोकेश यांना वारसदार घोषित केले आहे. तर वायएसआर काँग्रेसचे जगन हे वडिलांचा वारसा चालवत आहेत.
कर्नाटक : सीएमचा मुलगा सीएम
जेडीएस पक्ष माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे कुटुंब चालवतो. त्यांचे धाकटे पुत्र कुमारस्वामी हे कर्नाटकचे सीएम, त्यांचा मुलगा मंत्री व पत्नीही आमदार होत्या. सध्याचे सीएम बी.एस. बोम्मई (भाजप) यांचे वडील एस. आर. बोम्मईही कर्नाटकचे सीएम होते. माजी सीएम बी. एस. येदियुरप्पांचा मुलगा राघवेंद्र खासदार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.