आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण भारतातील आणखी एका राज्य सरकारने ‘मंदिर मार्ग’ निवडला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या द्रमुक सरकारने दोन वर्षांत राज्यातील ४४ हजार मंदिरांच्या ४५०० एकर जमिनीवरील अतिक्रमण काढले आहे. या जमिनीची किंमत ४२०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. यासह पहिल्यांदाच जवळपास १०० मोठ्या मंदिरांत येणाऱ्या भाविकांना नाष्टा देणेही सुरू केले आहे. या मंदिरांत कांचीपुरम येथील कामाक्षी मंदिर व मदुराई येथील मीनाक्षी मंदिराचा समावेश आहे. राज्यातील या १०० मंदिरांत दररोज दीड लाखापेक्षा अधिक भाविक येतात. द्रमुक सरकारने मंदिरांमार्फत चालवल्या जाणाऱ्या सुमारे तीन हजार शाळांमध्ये मध्यान्ह भोजन सुरू केले आहे.
जीर्णोद्धारासाठी 340 कोटींचा निधी द्रमुक सरकारने १००० वर्षे जुन्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी ३४० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. एचआर अँड सीई (हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एंडोमेंट) मंत्री शेखर बाबू यांनी मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एक स्वतंत्र टीम तयार केली आहे. तथापि, सरकारच्या आश्वासनानंतरही मंदिर कर्मचाऱ्यांच्या वेतनात पुरेशी वाढ झाली नाही, असे कांचीपुरम मंदिराचे मुख्य पुजारी नटराज शास्त्री यांनी सांगितले.
भाजपच्या जागा ११८ वरून ३०८ भाजपला २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत २.६ टक्के मते मिळाली होती. विधानसभेत भाजपचे चार आमदार आहेेत. या तुलनेत २०२२ मध्ये झालेल्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा मतांचा टक्का वाढून ५.४१ झाला. पहिल्यांदाच भाजपचे ३०८ उमेदवार विजयी झाले. मागील निवडणुकीत भाजपला १८ जागा मिळाल्या होत्या. भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी ३.४ होती.
भाजप राज्यात मोठ्या भूमिकेच्या शोधात : राजकीय विश्लेषक सुमंत रामण म्हणाले, की द्रमुक सरकार पहिल्यांदाच हिंदूंचे हित साध्य करण्याच्या प्रयत्नात आहे. सातत्याने वाढत असलेला भाजप मतांचा टक्का याचे मुख्य कारण आहे. अण्णाद्रमुक पक्षात अंतर्गत बंडाळ्या सुरूच असतात. काँग्रेस येथे द्रमुकच्या भरवशावर आहे. पीएम मोदी यांची राज्यातील लोकप्रिता हा भाजपचा सर्वात मोठा आधार आहे. ही लोकप्रियता पक्षाच्या जागा वाढण्यासाठी साह्यकारी ठरेल असे भाजपला वाटते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.