आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामान्यत: खेळाडूंची तंदुरुस्ती तपासण्यासाठी फ्लेमिंगो बॅलन्स टेस्ट म्हणजेच एका पायावर उभे राहून तोल सांभाळण्यास सांगितले जाते. त्यातून स्नायूंची क्षमता स्पष्ट होते. आता संशोधकांनी मध्यमवयीन व वृद्धांच्या आरोग्याच्या तपासणीत त्याचा समावेश करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. एका पायावर १० सेकंद तोल सांभाळू शकत असाल तर तुम्ही निरोगी आहात. मध्यमवयीन आणि वृद्धांच्या बाबतीत, ही छोटी चाचणी सांगते की त्यांचे शरीर किती दिवस कार्यरत राहू शकते.
अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फिनलंड आणि ब्राझील मधील तज्ञांसह ब्रिस्टल मेडिकल स्कूलच्या आंतरराष्ट्रीय गटाने नुकताच हे संशोधन पूर्ण केले. त्यांनी १२ वर्षे शरीराचा समतोल आणि मृत्युदर यांच्यातील संबंधांचा अभ्यास केला. संशोधकांच्या मते तुम्हाला एका पायावर संतुलन राखण्यात अडचण येत असेल तर ते गंभीर लक्षण असू शकते. जर मध्यमवयीन आणि वृद्ध व्यक्ती तोल सांभाळू शकत नसतील, तर १० वर्षांच्या आत त्यांच्या जीवाला धोका आहे. त्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र निष्कर्ष धक्कादायक आहेत. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. संशोधनकर्त्या पथकाने ५१ ते ७५ वयोगटातील १७०२ लोकांवर हा प्रयोग केला.. प्रथम आरोग्य तपासणी करण्यात आली. नंतर त्यांना एका पायावर १० सेकंद उभे राहण्यास सांगण्यात आले. त्यासाठी तीनदा प्रयत्न करण्याची परवानगी होती. त्यात पाचपैकी एक व्यक्ती (२०%) ही चाचणी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. ७१ ते ७५ वयोगटातील ५४% वृद्धांना संतुलन राखता आले नाही. ५१ ते ५५ वयोगटातील अशा लोकांची संख्या केवळ ५% होती. ५६ ते ६० वयोगटातील ८% व ६१ ते ६५ वयोगटातील केवळ १८% लोक एका पायावर उभे राहण्यास सक्षम होते. वृद्ध, जास्त वजन आणि मधुमेह असणारे चाचणीत अयशस्वी ठरले. वर्षानुवर्षे त्यांच्यावर लक्ष ठेवले गेले. सरासरी ७ वर्षांत त्यातील १२३ जण (सुमारे ७%) मरण पावले. यापूर्वीच्या अशाच पसंशोधनात संतुलन राखता येत नसलेल्यांना हृदयविकार व स्मृतिभ्रंशाचा धोका असल्याचे स्पष्ट झाले होसंशोधक म्हणतात, नियमित आरोग्य तपासणीत फ्लेमिंगो बॅलन्स टेस्ट हवी.
संशोधकांचे मत आहे की, मध्यम वयात फ्लेमिंगोसारखे एका पायावर उभे राहण्याची चाचणी नियमित आरोग्य तपासणीमध्ये समाविष्ट केली पाहिजे. त्यांच्या मते, ही चाचणी सुरक्षित आहे आणि दैनंदिन सरावात सहजपणे समाविष्ट केली जाऊ शकते. कारण त्यास एक किंवा दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.