आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्कराेगाच्या दुर्धर आजारातून सावरल्यानंतर लगेच टेबल टेनिस खेळण्याचा आपला छंद अविरतपणे जाेपासला. यादरम्यान सहा महिने फक्त याच खेळात स्वत:ला झाेकून दिले. त्यामुळे यादरम्यान केलेल्या प्रचंड मेहनतीच्या बळावर गुजरातच्या मिथून व्यासला वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याचा बहुमान मिळवता आला. यासाठी केलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या अथक परिश्रमातून ताे आेमानमध्ये आयाेजित वर्ल्ड वेटरन टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याची ही जिद्द आणि मेहनत निश्चितपणे युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे. याच किताबाने आता आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच आगामी जागतिक दर्जाच्या स्पर्धांमध्येही माेठे घवघवीत यश संपादन करण्याचा निर्धार त्याने केला आहे. त्यामुळेच आजारावर माेठा विजय संपादन करता आला, असेही त्याने सांगितले.
स्वत:मधील विजय प्रेरणादायी : कर्कराेगाच्या आजारावर मला स्वत:ला माेठा विजय संपादन करता आला. कारण, मी यातून पूर्णपणे सावरेल, असा मला स्वत:ला विश्वास हाेता. या आजारापणामुळे मी कधीही खचलाे नाही. कॅन्सर झाल्याचे मला ६ वर्षांपूर्वी कळले हाेते. त्यामुळे वेळीच उपचार घेत मी यातून सावरत गेलाे. सुरुवातीचा काळ फार कठिण हाेता. मन घट्ट करून मी यातून सावरण्याचा निर्धार केला हाेता. दु:ख न करता मी यातून सावरत गेलाे, असे ताे म्हणाला.
तीन वर्षांत २० पदके; २२ कॅन्सरग्रस्तांना मदत : गुजरातचा मिथून व्यास हा व्यवसायाने ग्राफिक डिझायनर आहे. अचानक प्रकृती खालावल्याने मी वैद्यकीय निदान केेले. कॅन्सर असल्याचे समाेर आले. मात्र, मी स्वत: दर्जेदार उपचार घेत गेलाे. मी टेबल टेनिसचा चांगला खेळाडू आहे. त्यामुळेच मला तीन वर्षांत २० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पदके जिंकता आले. आता माझ्यासारख्याच २२ पेक्षा अधिक कॅन्सरग्रंस्ताना मी मदत केली, असेही त्याने यादरम्यान सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.