आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Started The Business Of Packet Of Peas Coming For 1 Rupee, Now Own Factory Too; Success Story Of Anshul From Rajasthan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजची पॉझिटिव्ह बातमी:1 रुपयाच्या मटारच्या पॅकेटचा व्यवसाय सुरू केला, दुसर्‍या महिन्यात कमाई 50 हजारांवर पोहोचली; आता आहे स्वतःची फॅक्ट्री

अक्षय बाजपेयीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील अंशुल गोयल यांनी अभियांत्रिकी शिक्षणावेळी ठरवले होते की, मला व्यवसाय करायचा आहे

आजची कहाणी राजस्थानमधील टोंक जिल्ह्यात राहणार्‍या अंशुल गोयलची आहे. अंशुलने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. मात्र ते स्नॅक्स विकण्याचे काम करीत आहे. कॉलेजमधील उद्योजकता प्रकल्पाच्या वेळी त्यांनी व्यवसाय करण्याचा विचार केला होता. घरच्यांच्या सांगण्यावरून त्यांनी सरकारी नोकरीची तयारी देखील केली परंतु मन न लागल्यामुळे अभ्यास बंद केला. त्यांनी आपल्या साथीदारासह तीन वर्षांत एक ते दीड लाख रुपये मासिक उत्पन्नापर्यंत पोहोचले आहेत. हे सर्व त्याने कसे केले ते सांगत आहे.

पगारावर काम करायचे नव्हते

अंशुल सांगतात की, अभियांत्रिकीच्या शिक्षणादरम्यान नोकरी करण्याऐवजी व्यवसाय करावा असे मला वाटले. मला पगारावर काम करायचे नव्हते, तर माझा स्वतःचा मालक व्हायचे होते. तृतीय वर्षात महाविद्यालयात उद्योजकता कार्यक्रमात भाग घेतला.

एका बिझनेस प्रोजेक्टवर काम केले. मग मनात आले की आपल्याला व्यवसाय करायचा आहे. मी अभ्यास करून सरकारी नोकरी करावी अशी घरच्यांची इच्छा होती. सरकारी नोकरीची तयारी देखील केली. परंतु काही दिवसांनंतर मन लागले नाही आणि व्यवसायाबद्दल विचार करू लागलो.

अंशुलने आपल्या कामाची सुरुवात घरातून केली होती, नंतर कारखाना सुरू केला
अंशुलने आपल्या कामाची सुरुवात घरातून केली होती, नंतर कारखाना सुरू केला

अंशुल म्हणाले की, "मी काय बिझनेस करू शकतो यासाठी मार्केटमध्ये शोध घेत होतो. माझे बहुतांश नातेवाईक बिझनेसमन आहेत. त्यांच्याकडूनही सल्ला घेत होतो. व्यवसाय सुरू करण्यासाठी माझ्याकडे जास्त पैसे नव्हते. जे करायचे होते ते कमी बजेटमध्ये करायचे होते. एखादे उत्पादन किती विकू शकते हे मी पहात होतो. त्या उत्पदनाची मार्केटमध्ये क्रेडिट किती दिवसांची आहे. कोण सर्वात जास्त विकत घेतो अशा बर्‍याच गोष्टी पाहिल्यानंतर मला हिरव्या मटारचा व्यवसाय करण्याचे ठरवले."

अंशुल सांगतात की, माझ्या लक्षात आले की फ्राय मटार एक रुपयाला विकले जातात. ही पॅकेट्स खास मुलांना लक्ष्य करुन बाजारात आणली जातात. संशोधन केल्यावर मला कळले की या कामात गुंतवणूक कमी आणि परतीची शक्यता पूर्ण आहे. मी 2017 मध्ये दीड लाख रुपयांपासून हे काम करण्यास सुरुवात केली. माझे जवळपास 60 ते 70 हजार रुपये प्रिंटिंगमध्ये खर्च झाले. प्रिंटिंगची ऑर्डर मोठ्या द्यावे लागते.

पन्नास हजार रुपयांत पॅकिंगची एक सेकंड हँड मशीन खरेदी केली. याशिवाय बाजारातून दोन टन कोरडे वाटाणे खरेदी केले. सुरुवातीच्या पहिल्या महिन्यात बर्‍याच अडचणी आल्या. अनुभवाच्या अभावामुळे, आमचे वाटाणे कधीच पूर्णपणे तळले जात नव्हते, तर कधी कुरकुरीत होत नव्हते.

कधी तेल जास्त व्हायचे, तर कधी मसाल्यांचे व्यवस्थित मिश्रण होत नव्हते. माझ्या ओळखीच्या दुकानदारांना सॅम्पलिंगसाठी पाकिटे दिली होती. सर्वांनी फीडबॅक दिला. मग लक्षात आले की, तेल सुकवण्यासाठी, मसाला लावण्यासाठी वेगळ्या मशीन्स येतात आणि यासह अनेक लहानसहान गोष्टी माहीत झाल्या.

अंशुल यांनी 11 प्रॉडक्ट्स लॉन्च केले, दिवाळीनंतर ते चिप्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.
अंशुल यांनी 11 प्रॉडक्ट्स लॉन्च केले, दिवाळीनंतर ते चिप्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

दीड महिन्यात सुरू झाली कमाई

अंशुल सांगतात की, महिनाभर शिकल्यानंतर चांगले क्रिस्पी मटार कसे करतात हे मला समजले. आम्ही चांगला माल तयार करण्यास सुरवात केली. महिनाभरानंतर ऑर्डर वाढण्यास सुरुवात झाली. सुरुवातील टोंक जिल्ह्यांतील गावात पॅकेट पोहोचवले जात होते. दुसऱ्या महिन्यापासूनच माझी 45 ते 50 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ लागली. हे काम 6 महिन्यांपर्यंत चालू राहिले.

मग दुकानदारांनी सांगितले की त्याच्यासोबत येणार्‍या स्नॅक्सची इतर उत्पादने वाढवायला हवीत. त्या प्रॉडक्टची देखील चांगली डिमांड असते. मग मी विचार केला की जर मी उत्पादने वाढवली नाही तर मग काम कसे वाढेल? मटारच्या कामात मी एक मुलगा मटार फ्राय करण्यासाठी आणि दुसरा पॅकिंगसाठी ठेवला. मार्केटिंगचे काम मी स्वतः पाहत होतो.

मार्केटमधून 50 लाख उचलले, निम्मे फेडले सुद्धा

अंशुल सांगतात की, माझ्याकडे अनेक प्रॉडक्ट्स लॉन्च करण्यासाठी पैसे नव्हते. यानंतर मी एका पार्टनर जोडला. आम्ही प्रथम फर्म नोंदवली. मार्केट आणि बँकेतून सुमारे 50 लाख रुपये घेतले आणि एकाचवेळी 11 प्रॉडक्ट्स लॉन्च केले. टोंकबरोबरच आम्ही जयपूर व इतर भागात वितरणाद्वारे उत्पादने पोहोचवण्यास सुरवात केली.

ते म्हणाले की, कोरोना महामारीपूर्वी आमचे मासिक उत्पन्न एक ते दीड लाख होते. मार्केटमधून जो पैसा घेतला होता त्याचे 50% रक्कम फेडली होती. कोरोनामुळे 6 महिन्यांचा ब्रेक लागला होता. आता फॅक्ट्री पुन्हा सुरू केली. आज माझ्याकडे 30 लाख रुपयांच्या मशीन्स आहेत. आठ ते 10 कामगार आहेत.

आता आम्ही दिवाळीनंतर चिप्स लॉन्च करण्याची तयारी करत आहोत. ज्या लोकांना आपला व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना मी हेच सांगतो की, काम सुरू करण्यापूर्वी रिसर्च करा. त्या प्रॉडक्टचे मार्केट समजून घ्या. स्पर्धा खूप आहे, जर योग्य प्लॅनिंग केली नाही तर नुकसान होऊ शकते. अंशुल यूट्यूबवरील वर्किंग चॅनेलद्वारे लोकांना व्यवसायाचा सल्लाही देतात.