आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतीच्या पावसाने हाहाकार:अनेक राज्यात पूरपरिस्थिती आणि भुस्सखलन; उत्तराखंडमध्ये 47, तर केरळमध्ये 27 जणांचा मृत्यू, वायुसेनेकडून बचावकार्य सुरु

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात अनेक राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तराखंड आणि केरळमध्ये परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. उत्तराखंडमध्ये महापूर आणि पावसामुळे 42 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अनेक भागात आभाळ फाटल्याचे चित्र आहे. तर काही भुस्सखलन होत असून, अनेक मातीच्या ठिगाऱ्याखाली असल्याची भीती वर्तवली जात आहे. पावसामुळे आतापर्यंत उत्तराखंड राज्यातील विविध भागात 47 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. चार धाम यात्रा देखील पावसामुळे बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भाविकांना सांगितले आहे की, पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा यात्रा सुरु केली जाईल. तोपर्यंत कोणीही चारधाम यात्रेला येण्याचे प्रयत्न करू नये. असे आवाहन करण्यात आहे.

अल्मोडामध्ये घर पडल्याने 3 मुलांचा मृत्यू

अल्मोडामध्ये भुस्सखलनाबरोबर अनेक जणांचे घरे देखील पडली असून मंगळवारी पुन्हा एक घर कोसळले आहे. त्यात तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. भुस्सखलनामुळे अनेक भागात रस्ते देखील बंद झाली आहे. ठिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु आहे.

बचावकार्य सुरु
उत्तराखंडमध्ये पूरपरिस्थितीमूळे अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. भारतीय वायुसेना पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या गावात बचावकार्य करत आहे. वायुसेनाने पंतनगर भागात रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले असून, त्यासाठी 3x ध्रुव हेलिकॉप्टरदेखील मागवण्यात आले आहे. सुंदरखाल गावाजवळ 25 जण अडकले असून, त्यांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी नेले जात आहे.

केरळमध्ये 27 जणांचा मृत्यू
केरळमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तेथे देखील पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या भागात सुमारे 27 जणांना मृत्यू झाला आहे. तर काही जण अद्याप बेपत्ता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये 1 ते 19 ऑक्टोंबरदरम्यान 135% अधिकचा पाऊस पडला आहे. दरवर्षी येथे 192.7 मिमी पाऊस पडत असतो. मात्र यंदा 453.5 मिमी पाऊस झाला आहे.

11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

केरळमध्ये 11 जिल्ह्यांना पुन्हा 20 ऑक्टोंबरपासून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तिरुवनंतपुरम, पठानमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड़, मलप्पुरमस कोझीकोड, वायनाड आणि कन्नूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...