आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Statue Of Late BJP Leader Arun Jaitley Installed At Feroz Shah Kotla Stadium On His Birth Anniversary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिमेचे अनावरण:अमित शाहंच्या हस्ते अरुण जेटलींच्या प्रतिमेचे अनावरण, संकट काळात जेटलींनी मोठ्या भावाची भूमिका पार पाडली- अमित शाह

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेटलींच्या प्रतिमेमुळे सुरू झाला होता वाद

दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये दिवंगत भाजप नेते आणि माजी अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. गृहमंत्री अमित शाहंनी जेटलींच्या प्रतिमेचे अनावरण केले. यावेळी शाह म्हणाले की, 'अरुण जेटली जी माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. जेव्हा मी संकटात होतो, तेव्हा लोक काय म्हणतील, याचा विचार न करता, जेटलींनी मोठ्या भावाप्रमाणे माझी मदत केली.'

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली 1999 पासून 2013 पर्यंत DDCA चे अध्यक्ष होते. त्यांच्या नंतर रजत शर्मा DDCA प्रेसिडेंट बनले. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अरुण जेटलींचा मुलगा रोहन जेटली यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

'जेटली जी प्रत्येक प्रश्नाचे सडेतोड उत्तर द्यायचे'

कार्यक्रमाला संबोधित करताना शाह म्हणाले की, 'अरुण जेटली नरेंद्र मोदींचे खास साथीदार होते. जेटली जी तत्थ्यासह संसदेत भाष्य करायचे. भाराला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचे काम त्यांनी केले. अनेक वर्षे संसदेत गुजरातचे प्रतिनिधित्व केले. लोकांना सोबत घेऊन चालले. जेटली हे अतिशय तार्किक नेते होते. प्रत्येक प्रश्नाचे सडेतोड उत्तर द्यायचे.'

'पडद्यामागे राहून IPL ला मजबूत केले'

शाह पुढे म्हणाले की, 'अरुण जेटली यांनी पडद्यामागे राहुन आयपीएलला मजबूत केले. एक काळ असा होता की, पालक मुलांना क्रिकेटऐवजी अभ्यास कर म्हणायचे. आज अनेक मुले क्रिकेटला करिअर बनवत आहेत. क्रिकेटमध्ये दोनप्रकारे योगदान देता येते. एक म्हणजे, मैदानात खेळून आणि दुसरे म्हणजे क्रिकेटसाठी पोषक वातावरण तयार करुन. जेटलींनी दुसऱ्याप्रकारे योगदान दिले.'

जेटलींच्या प्रतिमेमुळे सुरू झाला होता वाद

काही दिवसांपूर्वी अरुण जेटलींची प्रतिमा लावण्यावरुन नाराज झालेले माजी गोलंदाज बिशन सिंह बेदी यांनी दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (DDCA) सोडली होती. बेदींचे म्हणने होते की, जेटली चाटुगिरी करणाऱ्यांसोबत असायचे. जेटली कर्तृत्ववान होते, पण एका गूगल सर्चवर कळेल की, त्यांच्या काळात डीडीसीएमध्ये किती भ्रष्टाचार झाला.'

बातम्या आणखी आहेत...