आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Steroid Dexamethasone, Which Saves The Lives Of Up To 35 Percent Of Corona Patients, Is Being Used First In Jaipur And Maharashtra But As A Low Dose

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वात स्वस्त लाइफ सेविंग औषध:60 वर्षांपासून होत आहे डेक्सामेथासोनचा वापर, यासाठी मोजावे लागतील फक्त 48 रुपये

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शास्त्रज्ज्ञांचे म्हणने आहे की, डेक्सामेथासोन स्टेरॉयड ग्रुपचे औषध आहे, याचा वापर इमरमेंसीमध्ये सपोर्टिव ड्रग म्हणून केला जातो

जगभरात सध्या डेक्सामेथासोनची चर्चा होत आहे. कोरोना महामारीदरम्यान हे औषध पहिल्यांदा लाइफ सेविंग ड्रग म्हणून समोर आली आहे. या औषधामुळे गंभीर स्वरुपातील रुग्णांच्या मरण्याची रिस्क 35% कमी होते. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीने आपल्या रिसर्चमध्ये याची पुष्टी केली आहे. भारतामध्येही या औषधाचा वापर कोरोना रुग्णांवर केला जात आहे. रिसर्चमध्ये हे औषध यशस्वी कसे झाले, यामुळे मृत्यूचा धोका कसा कमी होतो आणि याचा वापर कसा होत आहे ? जाणून घ्या जानकारांकडून या सर्व प्रश्नांची उत्तरे.

4 पॉइंटमध्ये रिसर्चच्या यशाची गोष्ट संशोधक पीटरच्या शब्दात

ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीचे संशोधक आणि चीफ इन्वेस्टिगेटर पीटर हॉर्बी यांनी सांगितल्यानुसार, रिसर्चदरम्यान आतापर्यंत समोर आले आहे की, डेक्सामेथासोनच एक असे ड्रग आहे, जे कोरोना रुग्णांच्या मृत्यूची प्रमाण कमी करते. हे औषध मृत्यूच्या आकडेवारीला एकतृतींश कमी करते. कोरोनाच्या 2,104 अशा गंभीर रुग्णांना हे औषध देण्यात आले, ज्यांना ब्रीदिंग मशीन किंवा ऑक्सीजनची गरज भासत होती. ज्या रुग्णांना ब्रीदिंग मशीनची गरज होती, त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण 35% कमी झाले. तर, जे ऑक्सीजन सपोर्टवर आहेत, त्यांच्यातील 20% प्रमाण कमी झाले. हे औषध अतिशय स्वस्त असल्यामुळे जागतील लेव्हलवर रुग्णांचा जीव वाचवण्यात मदत करेल. या औषधामुळे 10 दिवसापर्यंत चालणारा ट्रीटमेंट खर्च प्रती रुग्ण 477 रुपये, म्हणजेच 48 रुपये प्रतिदीन असेल.

Q&A: अँड्रोक्रायनोलॉजिस्ट डॉ. प्रकाश केसवानी यांच्याकडून समजून घ्या औषधाची माहिती

1. काय आहे डेक्सामिथेसोन आणि कधापासून होत आहे वापर ?

जागतील आरोग्य संघटनेनुसार, डेक्सामेथासोन एक स्टेरॉयड आहे, ज्याचा वापर 1960 पासून केला जात आहे. है औषध दमा, अॅलर्जी आणि काही विशिष्टप्रकारच्या कँसरमध्ये दिली जाते. 1977 मध्ये डब्ल्यूएचओने याला औषधाच्या महत्वाच्या मॉडल लिस्टमध्ये सामील केले होते. डब्ल्यूएचओचे डायरेक्टर जनरल टेड्रोस अधानोमने डेक्सामिथेसोनच्या यशावर म्हटले की, या औषधामुळे व्हेटिंलेटरवर असलेल्या किंवा ऑक्सीजनची गरज असलेल्या रुग्णांमधील मृत्यूचा धोका कमी होते.

जयपुरचे अँडोक्राटनोलॉजिस्ट डॉ. प्रकाश केसवानीने सांगितले, डेक्सामिथेसोन खूप जुनी स्टेरॉयड ड्रग आहे. स्टेरॉयडचा वापर अनेक आपातकालीन परिस्थितीत केला जातो. 

2. कोव्हिड-19 प्रकरणात कशाप्रकारे काम करते ?

ऑक्सफोर्डच्या रिसर्चमध्ये समोर आले आहे की, कोविड-19 च्या रुग्णांमध्ये सायटोकाइन स्टॉर्मची स्थिती तयार होते. या परिस्तितीत रोगापासून वाचवणारे इम्यून सिस्टीम शरिराविरोधात काम करुन, फुफ्फुसात सूज निर्माण करते. डॉ. प्रकाश केसवानी सांगतात की, हे स्टेरॉयड्स याय सायटोकाइन स्टॉर्मच्या स्थितिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. है औषध फुफ्फुसात संक्रमण असलेल्या रुग्णांना दिली जाते. भारतातही या औषधाचा लो-डोज जिला जात आहे.

3. कशाप्रकारे काम करते औषध ?

डॉ. प्रकाश केसवानीने सांगितले की, संक्रमित रुग्णांत सायटोकाइन स्टॉर्ममुळे जी इम्यून सिस्टीम फुफ्फुसाला संक्रमित करतात, हे औषध त्यालाच रोखण्याचे काम करते. 

4. देशात कोण बनवतो डेक्सामेथासोन ?

देशात डेक्सामेथासोनचा सर्वात मोठा सप्लायर अहमदाबादची फार्मा कंपनी जायडस कैडिला आहे. कंपनी दरवर्षी फक्त या औषधापासून 100 कोटी रुपयांचा जर्नओव्हर करते. कंपनीचे ग्रुप चेअरमन पंकज पटेल यांनी सांगितले की, देशात विपुल प्रमाणात या औषधाचा सप्लाय सुरू आहे. मागील 40 वर्षांपासून या औषधाचा वापर वेगवेगळ्या प्रमाणात होत आहे. हे औषध खूप स्वस्त आहे, याच्या एका इंजेक्शनची किमत 4-5 रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...