आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Stick Bombs, Alerts About Drone Attacks; High tech Gadgets To Be Used For Security, Yatra To Deploy Additional 350 Units Between June 30 And August 11

अमरनाथ यात्रा:​​​​​​​ स्टिक बॉम्ब, ड्रोन हल्ल्यांबाबत अलर्ट; सुरक्षेसाठी हायटेक गॅजेटचा होणार वापर, यात्रा 30 जून ते 11 ऑगस्टदरम्यान, अतिरिक्त 350 तुकड्या तैनात करणार

मोहित कंधारी | जम्मू/श्रीनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये ३० जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेआधी सीमावर्ती भागांत स्टिक बॉम्ब आणि ड्रोन आढळल्याने चिंता वाढली आहे. हे बॉम्ब सहजपणे एखाद्या वाहनात चिकटवले जाऊ शकतात आणि दुरून रिमोटने नियंत्रित करता येऊ शकतात. हे पाहता सुरक्षा संस्थांनी सुरक्षा मापदंड आणखी कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे दोन वर्षांपासून बाधित राहिलेली यात्रा ३० जून ते ११ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या वर्षी ७ ते ८ लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे. गुप्तचर संस्थांनी स्टिक बॉम्ब आणि ड्रोन हल्ल्याची शंका व्यक्त केली आहे. यात्रा सुरक्षित पार पडावी यासाठी अतिरिक्त ३५० तुकड्या अतिरिक्त बळ पाठवण्याचा निर्णय झाला आहे. त्या अमरनाथ यात्रा मार्गावर तैनात केल्या जातील.

सुरक्षा दले : नव्या धोक्यावर मात करण्यासाठी नवी रणनीती
- सामान्य लोक, चालक, क्लीनर यांना स्टिक बॉम्बबाबत माहिती दिली जाईल.
- यात्रामार्गावरील बेस कॅम्प/ट्रान्झिट कॅम्प आणि लंगरची सुरक्षा सीआरपीएफ करेल.
- ग्रामसंरक्षण समित्यांच्या मदतीने शस्त्रास्त्रे, दारूगोळ्याची तस्करी रोखली जाईल.
- ड्रोनची वाहतूक रोखण्यासाठी वेळोवेळी शोधमोहीम सुरू केली जाईल.
- सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे २४ तास यात्रामार्गाची निगराणी केली जाईल.

भाविकांना सल्ला : रोज ४-५ तास पायी चाला
प्रशासनाने यात्रेकरूंसाठी काय करावे आणि काय करू नये याचे दिशानिर्देशही जारी केले आहेत. त्यात म्हटले आहे की, फिट राहण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी ४-५ तास पायी चालावे. खूप उंचीवर श्वास घेण्यास अडचण येऊ नये यासाठी श्वसनाशी संबंधित व्यायाम करावा. चारधाम यात्रेदरम्यान अनेक भाविकांच्या निधनाच्या बातम्या आल्यानंतर प्रशासनाने नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. यात्रामार्गावर ७० आरोग्य केंद्रे तयार केली जातील.

बातम्या आणखी आहेत...