आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Stipulation In JPSC : If The Candidate Has More Than One Spouse; Then There Will Be No Appointment

...तर राज्यसेवेसाठी अपात्र:एकापेक्षा अधिक पती/पत्नी असल्यास राज्यसेवा परीक्षा देता येणार नाही; या राज्याने काढला अजब नियम

रांची6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यसेवा नियुक्ती परीक्षेत इतर राज्यांतील महिलांना लग्नाच्या आधारावर आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही

झारखंड लोकसेवा आयोगाने चार राज्य नागरी सेवांच्या रिक्त पदांवर (सातवी ते दहावीपर्यंत) नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु, नियुक्तीच्या जाहिरातीमध्ये प्रथमच एक अजब अट ठेवली आहे. यावर्षी राज्यसेवा परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकापेक्षा अधिक पती/पत्नी असल्यास त्यांना परीक्षा देता येणार नाही असे या अटीत म्हटले आहे.

जेपीएससीने जारी केलेल्या जाहिरातीच्या 7 व्या स्तंभाच्या 6 व्या विभागात स्पष्टपणे उल्लेख आहे की, तसे उमेदवार (पुरुष किंवा महिला) ज्यांना एकापेक्षा अधिक जिवंत पती/पत्नी असल्यास ते नियुक्तसाठी योग्य नाहीत. नागरी सेवा परीक्षेसाठी जेपीएससीच्या नियुक्तीच्या मागील कोणत्याही जाहिरातीमध्ये अशी कोणतीही अट नव्हती.

विवाहाच्या आधारावर महिलांना आरक्षण नाही

नागरी सेवा नियुक्ती परीक्षेत विवाहाच्या आधारावर इतर राज्यांतील महिला आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार नाहीत. राज्यसेवा परीक्षेच्या जाहिरातीच्या सातव्या स्तंभाच्या चौथ्या मुद्द्यात याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. इतर राज्याच्या महिलांना झारखंडमध्ये विवाहच्या आधारावर महिला आरक्षणाचा लाभ घेता येणार नसल्याचे जाहिरातीत म्हटले आहे.

आरक्षण कोट्यात कोणताही बदल होणार नाही

राज्यसेवा परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म सबमिट करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण उमेदवाराने ज्या कॅटेगिरीमध्ये त्यामध्ये नियुक्ती प्रक्रिया दरम्यान कोणताही बदल किंवा सुधारणा होऊ शकत नाही. ऑनलाईन अर्जात केलेल्या दाव्यांशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करण्याची शेवटची तारीख मुलाखतीच्या वेळी पडताळणी करण्याच्या शेवटची तारीख आहे.

बातम्या आणखी आहेत...