आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Stone Throwing At Prayagraj, Saharanpur To Take Action Against Nupur Sharma, Latest News And Update

UP त शुक्रवारच्या नमाजानंतर पुन्हा वाद:​​​​​​​नुपूर शर्मावर कारवाई करण्यासाठी प्रयागराज, सहारनपुरात दगडफेक, मुरादाबादेत तीव्र निदर्शने

कानपूर15 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

कानपुरात 3 जून रोजी झालेल्या दंगलीनंतर आज शुक्रवारचा पहिला नमाज झाला. यामुळे संपूर्ण राज्यात हाय अलर्ट असतानाच उत्तर प्रदेशच्या 3 शहरांत नमाजानंतर तीव्र निदर्शने झाली आहेत. प्रयागराजमध्ये नमाजानंतर संतप्त जमावाने दगडफेक केली. मुरादाबादेत 'नुपूर शर्माला फाशी द्या'चे पोस्टर हाती घेत निदर्शने केली. तर सहारनपूरमध्येही जमाव धार्मिक नारेबाजी करत रस्त्यावर उतरला. यामुळे नागरिकांनी घाबरून दुकाने बंद केली. या ठिकाणी दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे.

प्रयागराजच्या अटालामध्ये नमाजानंतर जमावाने रस्त्यावर उतरुन तीव्र निदर्शने केली. या ठिकाणी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली.
प्रयागराजच्या अटालामध्ये नमाजानंतर जमावाने रस्त्यावर उतरुन तीव्र निदर्शने केली. या ठिकाणी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली.

लाइव्ह अपडेट्स

 • भाजप नेत्या नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्यास एक कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा करणाऱ्या सतपाल तंवर यांच्याविरोधात कानपूर कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे.
 • भीम सेना प्रमुख सतपाल यांनी हे आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. वादीचे वकील विजय बक्षी यांनी सांगितले की कोर्टाने प्रकरण नोंदवून घेत 24 जून रोजी सुनावणी निश्चित केली आहे. त्या दिवशी साक्ष नोंदवली जाईल.
 • प्रयागराजमध्ये पोलिसांवर घरांतून दगडफेक करण्यात आली. पोलिसांनीही यावेळी प्रत्युत्तरादाखल दगड भिरकावले.
 • सहारनपूरमध्ये जमाव एवढा संतप्त झाला की पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर जमावाने दगडफेक केली. आता येथील स्थिती नियंत्रणात आहे.
 • एडीजी कायदा सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सहारनपूरमधील स्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे.
 • बिजनौरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय वातावरण बिघडवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
 • गोरखपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर एडीजी झोन अखिल कुमार स्वतः रस्त्यावर उतरले.
 • लखनऊच्या टीलेवाली मशिद परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे. ज्वॉइंट कमिश्नर पोलीस कायदा सुव्यवस्था पीयूष यांच्यासह उच्चपदस्थ पोलिस अधिकारी, 4 केंद्रीयसह पीएसीच्या 6 कंपन्या येथे तैनात आहेत. एडीसीपी पश्चिम चिरंजिवी नाथ सिन्हा यांनी शुक्रवारच्या नमाजामुळे राजधानी लखनऊला 9 झोन 36 सेक्टरमध्ये विभागण्यात आल्याचे सांगितले.
 • कानपूरमधील बेकनगंजच्या 3 किमीच्या कक्षेत पीएसीच्या 9 कंपन्यांचे 800 जवान, आरएएफच्या 3 कंपन्यांचे 375 जवान, शिघ्र कृती दल व पोलिसांचे शेकडो जवान तैनात आहेत. सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठीही 100 हून अधिक जणांची टीम तैनात करण्यात आली आहे.
 • प्रयागराजमध्ये नमाजानंतर रस्त्यावर उतरलेल्या जमावाने तीव्र निदर्शने केली.
सहारनपूरमध्ये मशिदीबाहेर पडताच जमावाने नारेबाजी सुरू केली. त्यामुळे दुकानदारांनी दुकाने बंद केली. पोलिसांनी या संपूर्ण परिसराचे छायाचित्रण केले आहे.
सहारनपूरमध्ये मशिदीबाहेर पडताच जमावाने नारेबाजी सुरू केली. त्यामुळे दुकानदारांनी दुकाने बंद केली. पोलिसांनी या संपूर्ण परिसराचे छायाचित्रण केले आहे.
कानपूरच्या संवेदनशील भागांतील उंच इमारतींच्या छतांवरुन निगराणी केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आलेत.
कानपूरच्या संवेदनशील भागांतील उंच इमारतींच्या छतांवरुन निगराणी केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आलेत.
कानपूरच्या संवेदनशील यतीमखाना परिसरात भयावह शांतता आहे.
कानपूरच्या संवेदनशील यतीमखाना परिसरात भयावह शांतता आहे.
ड्रोन कॅमेऱ्याद्वारे कानपूरच्या संवेदनशील भागांत नजर ठेवली जात आहे.
ड्रोन कॅमेऱ्याद्वारे कानपूरच्या संवेदनशील भागांत नजर ठेवली जात आहे.
बातम्या आणखी आहेत...