आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:'गोल्डन टेम्पल मेल'वर दगडफेक, मुंबईहून अमृतसरला जाताना बियासजवळ घडली घटना; ट्रेनच्या काचेच्या खिडक्या फुटल्या

अमृतसर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईहून अमृतसरला जाणाऱ्या गोल्डन टेंपल मेल ट्रेन क्रमांक 12903 वर शनिवारी रात्री अज्ञात तरुणांनी दगडफेक केली. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या घटनेमुळे रेल्वेतील प्रवाशांत घबराटीचे वातावरण पसरले. रात्री 11.23 वा. अमृतसरला पोहोचल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

B2 कोचच्या आतील काचेला गेलेला तडा. ही काच फुटली असती तर मोठे नुकसान झाले असते.
B2 कोचच्या आतील काचेला गेलेला तडा. ही काच फुटली असती तर मोठे नुकसान झाले असते.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, ही ट्रेन 12 मे रोजी मुंबईहून निघाली होती. 13 मे रोजी रात्री 12.45 वाजता ती बियास रेल्वे स्थानकावरून निघाली. त्यानंतर काही मिनिटांतच रेल्वेवर दगडफेक झाली. या घटनेत रेल्वेच्या एसी कोच बी1 व बी2 च्या काचेच्या खिडक्यांवर दगड आदळल्याने स्थिती अधिकच संवेदनशील बनली.

डबल लेअर काचेचा एक थर फटला
मुंबईहून अमृतसरला येणारे प्रवीण जैन यांनी सांगितले की, या घटनेमुळे ट्रेनमधील एसी कोच बी1 व बी2 च्या अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या. ट्रेनमध्ये डबल लेअरच्या काचेच्या खिडक्या असतात. त्यातील एक थर सुरक्षित राहिल्यामुळे प्रवाशांना कोणतीही इजा पोहोचली नाही. या खिडक्यांचा बाहेरचा लेअर फुटला होता. आतील बाजूस फक्त तडे गेले. त्यामुळे प्रवाशी सुरक्षित राहिले. आतील काच फुटली असती तर आतील प्रवाशी काच व दगडांनी जखमी झाले असते.