आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:आसाममध्‍ये बालविवाहाविरोधात अटकसत्र बंद करा - लॉ बोर्ड

लखनऊ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये रविवारी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या (एआयएमपीएलबी) कार्यकारिणीची बैठक झाली. यात बाल विवाहाशी संबंधित अटकेचा मुद्दा उचलण्यात आला. बोर्डाच्या सदस्यांनी सांगितले की, आसाम पोलिसांनी अटक त्वरित रोखल्या पाहिजेत. पर्सनल बोर्डाचे सचिव मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी म्हणाले, देशात समान नागरी कायदा योग्य नाही. हे यासाठी की, देशात विविध धर्म आणि संस्कती मानणारे लोक आहेत. बोर्ड सरकारच्या कोणत्याही अशा प्रयत्नांना विरोध करेल. आम्हाला कायद्याच्या कक्षेत विरोध करण्याचा हक्क आहे. या प्रकरणी राजकारणी व जबाबदार व्यक्तींशी चर्चा करू. कार्यकारिणीच्या मंजूर प्रस्तावानुसार, देशात द्वेषाचे विष पसरत आहे. धर्मांतर, धर्म प्रचाराशी संबंधित राज्यांत कायद्यांना विरोध केला. प्रार्थना स्थळ अधिनियम १९९१ कायम ठेवावा.

आसाममध्ये आतापर्यंत ४०७४ बालविवाह प्रकरणांची नोंद आसाममध्ये बाल विवाहाविरोधात आतापर्यंत ४०७४ गुन्हे दाखल केले आहेत. सीएम हिमंत बिस्वा सरमा यांच्या सांगण्यावरून बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोहीम सुरू आहे. यात शनिवारपर्यंत २२७८ लोकांना अटक केली आहे. सर्वात जास्त १३९ अटक बिस्वनाथ जिल्ह्यात झाल्या.

बातम्या आणखी आहेत...