आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजब:तीन वेळा लग्नाची तारीख ठरवून, दुसरीशीच विवाहाचा डाव; तरुणास प्रेयसीने भर रस्त्यात बडवले, 6 तासानंतर दोघे अखेर विवाहबंधनात

मोगाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
कार खराब झाल्याने वाटेत थांबला होता नवरदेव, घरच्यांना बोलावून केले लग्न - Divya Marathi
कार खराब झाल्याने वाटेत थांबला होता नवरदेव, घरच्यांना बोलावून केले लग्न
  • दिव्य मराठी विशेष : पंजाबच्या मोगा येथे जात होती वरात, प्रेयसी कामास होती तेथेच खराब झाली त्याची कार
  • प्रेयसीचेही झाले दोन विवाह, पती पळून गेले

नवदीप सिंगला

कोरोनाचा साथरोग आणि वर संचारबंदी लागू. अशा परिस्थितीचा फायदा घेणे एका प्रियकरास खूप महागात पडले. तो मंुडावळ्या बांधून  दुसऱ्याच तरुणीशी लग्न करण्यास फुलांनी सजवलेली कार घेऊन निघाला होता. त्याच्या दुर्दैवाने कार अशा ठिकाणी बंद पडली, जेथे त्याची प्रेयसी काम करते. तो कारमधून खाली उतरला. तेवढ्यात प्रेयसी समोरून आली. तिने त्याला पाहिले आणि संतापाच्या भरात त्याच्या फुलांच्या मुंडावळ्या खेचून फेकल्या. कारवरची फुलेही काढून टाकली आणि प्रियकराला बेदम चोप देण्यास सुरुवात केली. 

थोड्या वेळाने तेथे पोलिस आले आणि त्यांनी आपसात समेट घडवला. त्या दोघांचे लग्नही लावून दिले. तरुणीने ही फिल्मीस्टाइल कथा सांगताना म्हटले, आम्ही गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह इनमध्ये आहोत. गेल्या ५ मार्च रोजी आमचे लग्न होणार हाेते. नंतर त्याने १५ मार्च तारीख ठरवली. नंतर ५  एप्रिल केली. नंतर संचारबंदीचे कारण सांगून ५ मे तारीख ठरवली होती. 

हे प्रकरण पंजाबच्या मोगा येथील आहे. नवरदेव जगसिरसिंह हा सुरक्षा रक्षक आहे. तर संतनगर येथील तरुणी जसप्रीतकौर लुधियाना रोडवरील वस्तीत लोकांच्या घरात मोलकरणीचे काम करते. जसप्रीतची यापूर्वी दोन लग्ने झाली. पण पहिला नवरा सहा महिन्यांत परप्रांतीय बाईसोबत पळून गेला. दुसरे लग्न झाले. तो एक वर्षानंतर एका डान्सरसोबत पळून गेला. तिला एक मुलगी आहे. आता ती जगसीरसिंहसोबत ३ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत होती. घरच्यांनी तिच्या लग्नास होकार दिला होता. 

कार खराब झाल्याने वाटेत थांबला होता नवरदेव, घरच्यांना बोलावून केले लग्न

बुधवारी ही महिला सोसायटीतील कामे संपवून सकाळी ९.३० वाजता स्कूटीने घराकडे जात असताना फुलांनी सजवलेली कार पाहिली. नवरदेव कारजवळ उभा होता. त्याला पाहताक्षणीच तिने ओळखले. आधी त्याची पिटाई केली. नंतर घरच्यांना आणि पोलिसांना कळवले. नंतर पोलिस ठाण्यात दोन्ही पक्षात तडजोड झाली. जगसीरने प्रेयसी जसप्रीतशी लग्न करावे असे ठरले. दुपारी ३ च्या सुमारास दोघांचे लग्न लागले आणि सासरी पाठवणीही झाली. 

बातम्या आणखी आहेत...