आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट3 नराधमांनी केला सलग 6 महिने गँगरेप:14 वर्षांची पीडित मुलगी झाली आई; आता मांडीवर दीड वर्षांचे बाळ, पण छळ संपेना

आशिष उरमलिया, रक्षा सिंह25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खालील छायाचित्र बाराबंकी जिल्ह्यातील एका निष्पाप मुलीचे आहे. वय 16 वर्षे. 2 वर्षांपूर्वी 3 नराधमांनी तिच्यावर सलग 6 महिन्यांपर्यंत सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला गावाबाहेरील झाडीत फेकून देण्यात आले. आता या मुलीच्या मांडीवर दीड वर्षांचा मुलगा आहे.

आता नोव्हेंबर 2022 मध्ये ही मुलगी व तिचे आई-वडील बाराबंकी जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. कारण, तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींच्या कुटुंबीयांनी तक्रार मागे घेण्यासाठी तिच्या कुटुंबीयांना मारहाण केली. तिच्या आई-वडीलांचे हात-पाय मोडले. फावडे मारून डोकेही फोडले.

त्यावेळी मुलीचा छोटा भाऊ, छोटी बहीण व मुलगा घरात होता. त्यामुळे ते वाचले. पण मुलीच्या डोक्यात खोलवर जखम झाली आहे. ही जखम आजही भळभळती आहे. आता हे छायाचित्र पाहा. त्यानंतर आम्ही तुम्हाला या मुलीवरील अत्याचाराची संपूर्ण कहाणी सांगू...

छायाचित्रात दिसणाऱ्या या 16 वर्षीय मुलीवर 2 वर्षांपूर्वी 3 जणांनी सलग 6 महिने सामूहिक बलात्कार केला होता.
छायाचित्रात दिसणाऱ्या या 16 वर्षीय मुलीवर 2 वर्षांपूर्वी 3 जणांनी सलग 6 महिने सामूहिक बलात्कार केला होता.

बिस्कीट आणण्यासाठी दुकानावर गेली अन् परतलीच नाही

2020 चा उन्हाळा सुरू होता. कदाचित जून किंवा जुलैचा महिना असेल. मुलीला महिना आठवत नाही. सायंकाळच्या वेळी ती घरातून बिस्कीट आणण्यासाठी दुकानावर गेली. दुकान घराजवळच 200 मीटर अंतरावर होते. मुलगी सामान घेऊन घरी परत येत होती. पण गावातीलच चंद्र प्रकाश तिवारी (65), सरवन (25) व चंदन (14) या 3 नराधमांनी पाठीमागून तिच्या तोंडाला पांढरा रूमाल लावला. यामुळे मुलगी बेशुद्ध झाली.

एका अंधाऱ्या खोलीत गँगरेप

मुलीला शुद्ध आली तेव्हा ती एका अंधाऱ्या खोलीत जमिनीवर पडली होती. काही वेळांनी ते तीन नराधम आले. तिला मारहा करून निघून गेले. रात्री दोघे पुन्हा आले. त्यांनी मुलीवर बलात्कार केला. मुलगी वेदनांनी ओरडत होती. पण ते ऐकणारे कुणीच नव्हते.

सकाळी जेवण, रात्री रेप

गँगरेपचा हा प्रकार जवळपास 6 महिन्यांपर्यंत चालला. ते लोक दिवसातून दोनवेळा खोलीत येत. सकाळी तिला खाण्यासाठी काहीतरी देवून जात. तर रात्री तिघांपैकी कुणीतरी येऊन तिच्यावर बलात्कार करत. त्यानंतर ती दिवसभर खोलीत एकटीच विव्हळत पडून राहत. जोरजोरात ओरडत.

पीडिता सांगते, “जेव्हा मी खूप जोराने ओरडत होते, तेव्हा ते मला बेशुद्ध करत होते. कधी-कधी मी शुद्धीवर आले तेव्हा माझे कपडे बदललेले दिसत होते. ते बेशुद्ध असतानाच माझे कपडे बदलत होते.”

6 महिन्यानंतर पीडिता घरी पोहोचली

या काळात पीडितेच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. अनेकदा पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. पण पोलिस लवकरच शोधू असे सांगून वेळ मारून नेत.

6 महिन्यांनंतर आरोपींनी पीडितेला गावाजवळील झाडीत फेकून दिले. ती बेशुद्ध झाली. जवळपास अर्ध्या तासांनी शुद्ध आल्यानंतर ती लडखडत घरी पोहोचील. एवढ्या दिवसांनी मुलीला पाहिल्यानंतर आई-वडील आनंदी झाले. पण तिची स्थिती पाहून ते काळजीत पडले. पीडितेने त्यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. आतापर्यंत पोलिसांनी पीडिता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली नव्हती.

हे एका आरोपीचे घर आहे. त्यातील एका खोलीत पीडितेला कैद करून ठेवण्यात आले होते. पीडितेचे ओरडणे घराबाहेर पडत नव्हते.
हे एका आरोपीचे घर आहे. त्यातील एका खोलीत पीडितेला कैद करून ठेवण्यात आले होते. पीडितेचे ओरडणे घराबाहेर पडत नव्हते.

गरोदरपणाच्या वेदना झाल्या, तर पोटदुखीचे औषध घेत होती

काही दिवस गेले. पीडिता हळूहळू सर्वकाही विसरू लागली. पण अचानक एकेदिवशी तिची प्रकृती बिघडली. दररोज उलट्या होत होत्या. पोटही दुखत होते. दुखणे वाढले की ती औषधे घेत होती. थोडा आराम पडत होता. काही दिवस असेच गेले. पण पोटदुखी थांबली नाही. पीडिता आपल्या आई-वडिलांसबोत डॉक्टरांकडे केली. तिची तपासणी झाली.

मुलीला आपण आई होणार असल्याचे समजले

तपासणीचे रिपोर्ट्स आले. ते पाहून मुलीच्या आई-वडीलांच्या पायाखालीच वाळू सरकली. मुलीच्या पोटात बाळ होते. मुलीच्या आईने सांगितले, “आम्ही खूप हिंमत गोळा करून मुलीला ती आई होणार असल्याचे सांगितले. तसेच स्थितीशी दोनहात करत तिचे मूल सांभाळण्याचाही निर्णय घेतला.”

आरोपींनी गर्भपातासाठी औषध दिले

मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आरोपींना आमची मुलगी गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर ते दररोज घरी येऊन तिला डॉक्टरांकडे घेऊन जात. त्यांनी गर्भपात करण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यांनी तिला अनेक प्रकारची औषधी दिली. ते धनदांडगे असल्यामुळे आम्हाला त्यांच्यापुढे काहीच करता आले नाही. तसेच चंद्र प्रकाश तिवारीवर यापूर्वीही मारहाण व दांडगाईचे अनेक गुन्हे दाखल होते.

पण सर्वच डॉक्टरांनी त्यांना मुलीचा गर्भपात करण्यास नकार दिला. कारण तिचे वय केवळ 14 वर्षांचे होते. गर्भपातामुळे तिच्या मुलीच्या जिवाला धोका उद्भवण्याची भीती होती.

गर्भपात झाला नाही म्हणून रेपिस्टसोबत लावून दिले लग्न

ज्या 3 जणांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला, त्यातील एका अल्पवयीन मुलाशी तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले.
ज्या 3 जणांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला, त्यातील एका अल्पवयीन मुलाशी तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले.

वर्ष 2021, घटनेला जवळपास 6-7 महिने लोटले होते. मुलीच्या पोटात बाळ वाढत होते. एकेदिवशी सरपंचासह गावातील काही नागरिक मुलीच्या घरी आले. आई-वडीलांना बेशुद्ध केले. मुलीला जबरदस्तीने मंदिरात नेले. तिथे तिला साडी घालून तयार करण्यात आले. तिचे बलात्कार करणाऱ्या 3 आरोपींपैकी एकाशी लग्न लावून देण्यात आले.

मुलीचे लग्न ज्याच्याशी लग्न झाले, तो ही अल्पवयीन होता. त्याचे वजय जवळपास 14 वर्षांचे होते. लग्न झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची गावभर चर्चा सुरू झाली. मुलीच्या कुटुंबीयांनी यावेळी स्थानिक पोलिस ठाण्याऐवजी बाराबंकी ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानतंर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. सध्या चंद्र प्रकाश तिवारी व सरवन तुरुंगात आहेत. तर चंदन बालसुधारगृहात आहे. त्यानंतर काही दिवसांनी पीडितेने एका मुलाला जन्म दिला. आता हे बाळ दीड वर्षांचे आहे.

छायाचित्रात पीडितेचे बाळ दिसत आहे. ते आता दीड वर्षांचे झाले आहे.
छायाचित्रात पीडितेचे बाळ दिसत आहे. ते आता दीड वर्षांचे झाले आहे.

...कहाणी येथेच संपत नाही

30 ऑक्टोबर 2022, मुलीचे वडील शेतात गेले. तिथे आरोपी चंद्र प्रकाश तिवारीच्या कुटुंबातील 2 मुले उभे होते. दोन्ही पक्षांत आपसात शिवीगाळ झाली. जोरदार भांडण झाले. पण प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही.

पीडितेचे डोके फोडले, आई-वडिलांचे हात-पाय मोडले

हल्ला झाला तेव्हा पीडितेचे आई-वडील याच बाजेवर आराम करत होते. बाजेवरील एक गोधडी रक्ताने माखली होती. ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
हल्ला झाला तेव्हा पीडितेचे आई-वडील याच बाजेवर आराम करत होते. बाजेवरील एक गोधडी रक्ताने माखली होती. ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

भांडणाला जवळपास तासभर झाला होता. पीडितेचे आई-वडील घराबाहेरील बाजेवर आराम करत होते. तेव्हा चंद्र प्रकाश तिवारीच्या घरातील 3-4 मुले हातात लाठ्याकाठ्या घेऊन आले. त्यांनी वडिलांच्या पायावर मारहाण केली. माझ्या आईलाही खूप मारले. त्या दोघांचेही हातपाय मोडेपर्यंत त्यांनी मारहाण थांबवली नाही.

छायाचित्रात निळ्या कपड्यात पीडिता, लाल साडीत तिची आई व सोबत वडील आहेत. तिघांवरही गत रविवारी आरोपींच्या कुटुंबीयांनी हल्ला केला. त्यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली.
छायाचित्रात निळ्या कपड्यात पीडिता, लाल साडीत तिची आई व सोबत वडील आहेत. तिघांवरही गत रविवारी आरोपींच्या कुटुंबीयांनी हल्ला केला. त्यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली.

पीडिता व तिची छोटी बहीण घरातील स्वयंपाक घरात काम करत होत्या. आपल्या पालकांचे ओरडणे ऐकून त्या बाहेर आल्या. तेव्हा आरोपींनी त्यांच्याही डोक्यात फावडे मारले. मुलीच्या डोक्यात खोलवर जखम झाली आहे.

छायाचित्रात पीडितेच्या घरातील स्वयंपाक घर दिसत आहे. पीडितेला आई-वडील, छोटा भाऊ व एक बहीण आहे. आता पीडितेचा मुलगाही आहे. निळ्या कपड्यातील पीडितेची छोटी बहीण असून, मारहाण झाली तेव्ही ती पीडितेसोबत किचनमध्ये होती.
छायाचित्रात पीडितेच्या घरातील स्वयंपाक घर दिसत आहे. पीडितेला आई-वडील, छोटा भाऊ व एक बहीण आहे. आता पीडितेचा मुलगाही आहे. निळ्या कपड्यातील पीडितेची छोटी बहीण असून, मारहाण झाली तेव्ही ती पीडितेसोबत किचनमध्ये होती.

सध्या...

मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच मुलीच्या आई-वडिलाना बाराबंकी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अखेरीस आम्ही आरोपींच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. चंद्र प्रकाश तिवारीच्या घरी त्याची म्हातारी आई होती. उर्वरित संपूर्ण कुटुंब तुरुंगात होते किंवा बाहेरगावी राहण्यासाठी गेले होते. त्यानंर आम्ही सरवन व अल्पवयीन आरोपीच्या घरी पोहोचलो. तिथे त्यांच्या बहिणीशी झालेली चर्चा खाली देत आहोत...

आरोपीच्या कुटुंबीयांनी मुलीची देखभाल केली

छायाचित्रात लाल साडीत आरोपीची वहिणी व 3 बहिणी दिसून येत आहेत.
छायाचित्रात लाल साडीत आरोपीची वहिणी व 3 बहिणी दिसून येत आहेत.

आरोपीच्या बहिणीने सांगितले की, त्या मुलीचे आमच्या भावाशी लग्न व्हावे असे आम्हाला वाटत नव्हते. आमचा भाऊ त्या मुलीहून छोटा आहे. पण गावकऱ्यांनी जबरदस्तीने आमच्या भावाला पकडून लग्न लावून दिले.

लग्नानतंर मुलगी जवळास 20 ते 25 दिवसांपर्यंत आमच्या घरी राहिली. तिच्या पोटात बाळ होते. त्यामुळे आम्ही तिची पूर्ण काळजी घेतली. पण त्यानंतरही ती निघून गेली. माझ्या भावाविरोधात तक्रार दाखल केली. सध्या अल्पवयीन भाऊ तुरुंगात आहे.

बातम्या आणखी आहेत...