आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील 7 राज्यांतील 300 किलोहून अधिक सोने लुणाऱ्या बिहारच्या सुबोध गँगविषयी एक मोठा खुलासा झाला आहे. या टोळीत 200 हून अधिक धूर्त चोरटे आहेत. त्यातील अनेकजण सुबोधसोबत पाटण्याच्या बेउर तुरुंगात बंदिस्त आहेत. सुबोधने तिथेच चेन स्नॅचर्स (साखळी चोर) व सोने लुणाऱ्यांची मुलाखत घेऊन आपल्या टोळीत भरती करत होता.
नाव न सांगण्याच्या अटीवर तुरुंगातून बाहेर पडलेल्या एका कैद्याने दिव्य मराठीला ह्या गोष्टी सांगितल्या. हा व्यक्ती पूर्वी सुबोधला ओळखत होता. तुरुंगात राहून त्याने सुबोध गँगच्या हालचाली जवळून पाहिल्या होत्या.
प्रथम या गँगविषयी जाणून घेऊया...
ही टोळी 7 राज्यांत सक्रिय आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा आदी राज्यांत ही टोळी सक्रिय आहे. या राज्यांत सुबोधच्या नावाने अनेक गुन्हे दाखल आहेत. राजस्थान व मध्य प्रदेश पोलिसांनी नुकतीच या टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी बिहारच्या अनेक जिल्ह्यांत छापेमारी केली होती.
29 ऑगस्ट रोजी राजस्थानच्या उदयपूरध्ये मण्णपुरम गोल्ड फायनान्सच्या कार्यालयात दरोडा पडला होता. येथून 24 किलो सोन्याची चोरी करण्यात आली होती. तत्पूर्वी 26 नोव्हेंबर रोजी कटनीतील मण्णपुरम गोल्ड फायनान्सच्या कार्यालयातही 6 दरोडेखोर 16 किलो सोने घेऊन पसार झाले होते. या घटनांतही या टोळीचे नाव पुढे आले होते. याचा मास्टरमाइंड 8वीपास सुबोध आहे. या घटनेप्रकरणी दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी बिहारमध्ये छापेमारी केली होती.
बेउर तुरुंगात राहिलेल्या कैद्याने आणखी काय सांगितले...
1. तुरुंगातील गुंडांवर नजर ठेवतात गँगचे पंटर्स, सुविधाही देतात
कैद्याने सांगितले ,'गँगमध्ये नव्या चोरांची बरती बेउर तुरुंगातच होते. तुरुंगात एखादा साखळी चोर आला की, सुबोध सिंहचे पंटर्स त्याच्यावर नजर ठेवतात. गँगमध्ये त्याची भरती झाली की त्याला तुरुंगातच व्हीआयपी सुविधा उपलब्ध करवून दिल्या जातात.
2. ब्रेन वॉश करून म्हणतात- काही मोठे करायचे असेल तर गँगमध्ये या...
'गुंडांच्या मनात सुबोधविषयी सहानुभूती निर्माण झाली की सुबोध व त्याचे सहकारी त्यांचे ब्रेन वॉश करतात. छोटी-मोठी चोरी करण्यात कोणताही फायदा नाही. काही मोठे करायचे असेल तर आमच्या टोळीत या, असे ते त्यांना सांगतात.
3.प्रथम जामीन, नंतर ट्रेनिंग
सुबोधचे पहिले काम निवड झालेल्या गुंडांना जामीन मिळवून देण्याचे असते. तो बाहेर आल्यानंतर तुरुंगाबाहेरील पंटर्स त्यांना ट्रेनिंग देतात. सोन्याची लुटमार कसे करतात हे शिकवतात.
4. दरमहा वेतन, इंन्सेटिव्ह
सुबोध आपल्या पंटर्सची विशेष काळजी घेतो. काही चोरांना तो दरमहा वेतनही देतो. यामुळे ते त्याच्याप्रती प्रामाणिक राहतात. याशिवाय मोठ्या लुटीतील काही भागही तो प्रोत्साहन भत्ता म्हणून त्यांना देतो.
आता पाहूया...ही टोळी चोरी कशी करते
कैद्याने सांगितले , 'ही टोळी सामान्यतः मण्णपुरम गोल्ड लोन कंपनीलाच टार्गेट करते. या टोळीचे सदस्य हॉटेलात थांबत नाहीत. ज्या शहरातील मण्णपुरम गोल्ड लोन शाखेवर डल्ला मारायचा आहे, त्या शहरात या टोळीचा एक सदस्य खोली घेतो. हा व्यक्ती स्वतःची ओळख विद्यार्थी म्हणून करवून देतो. त्यानंतर लूट करण्यासाठी शाखेत जाणून आठवडाभर रेकी करतो. संपूर्ण प्लॅन बनवल्यानंतर तो टोळीच्या इतर गुंडाना बोलावतो.'
कैद्याच्या माहितीनुसार, 'स्वतःला अधिकारी असल्याचे सांगत 7-8 जण मण्णपुरम गोल्ड लोनच्या ब्रँचमध्ये दाखल होतात. आत जाताच ते सर्वांना गन पॉइंटवर घेतात. त्यानंतर सोन्याची लुट करून तेथून पळून जातात. या लुटीनंतर ते तत्काळ शहरातून पळून जात नाहीत. ते काही दिवस त्याच भाड्याच्या खोलीत राहतात. प्रकरण शांत झाल्यानंतर ते तेथून हळूच पळून जातात.'
नेपाळ व कोलकात्यात सोन्याची विक्री
पोलिसांनी सांगितले की, ही टोळी लुटीचे सोने नेपाळ व पश्चिम बंगालमध्ये जाऊन विक्री करतात. प्रथम दागिणे गाळून त्याचे बिस्कीट तयार करतात. त्यानंतर ते विक्री करण्याचा प्रयत्न करतात.
कटनी मण्णपुरम गोल्ड लोन कंपनीत शनिवारी सकाळी 7 कोटींचा दरोडा पडला होता. या लुटीत सुबोध गँगचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.