आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी विधानसभा निवडणुका आणि २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक पाहता राजकीय पक्षांनी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याची तयारी केली आहे. भारत जोडो यात्रा पूर्ण केलेल्या काँग्रेसने ‘हाथ से हाथ जोडो’ मोहीम राबवली आहे. तर बजेटमधील घोषणांच्या व्यापक प्रसिद्धीसाठी भाजप देशभरात कार्यक्रम घेत आहे. या शृंखलेत शेतकऱ्यांपर्यंत बजेटमधील घोषणा पोहोचवणे आणि त्यांच्यात पकड मजबूत करण्यासाठी भाजप २४ जानेवारीपासून देशव्यापी अभियान राबवणार आहे. एक वर्ष चालणाऱ्या या अभियानाचे लक्ष्य एक लाख गावांत पदयात्रा काढून कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आहे. भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चाहर म्हणाले, बजेटमध्ये सरकारने सेंद्रीय शेती आणि भरड धान्यावर अधिक भर दिला आहे. अर्थसंकल्पीय घोषणा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ६ ते १२ फेब्रुवारीपर्यंत देशभरात शेतकरी मेळावे होतील. १३ फेब्रुवारीला दिल्लीत किसान मोर्चा, सोशल मीडिया आणि नैसर्गिक शेतीशी संबंधित संघांना प्रशिक्षण दिले जाईल. राज्यांमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक लाख गावांत जनजागृती यात्रा काढू. शेतकरी सन्मान निधीला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २४ फेब्रुवारीला सर्व जिल्ह्यांत लाभर्थींशी संवाद आणि संपर्क केला जाईल. शेतकऱ्यांना नद्यांच्या किनाऱ्यांवरील सेंद्रीय शेतीशी जोडण्यासाठी अभियान राबवले जाईल. सर्व प्रमुख नद्यांच्या काठांवर यात्रा काढल्या जातील. याचा प्रारंभ या महिन्याच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरातील शुक्रतालमध्ये भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर करतील. सू़त्रांच्या मते कर्नाटकात २९-३० जानेवारीला झालेल्या किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मिशन २०२४ साठी सक्रियपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याची बाब ठळकपणे समोर आली. वाराणसी येथे नुकत्याच झालेल्या संगमम कार्यक्रमाच्या धर्तीवर भाजप उत्तर भारतातील कार्यकर्ते आणि नेत्यांना दक्षिणेकडील प्रसिद्ध स्थळांवर पाठवेल. यात भाजप नेते सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळांना भेटी देतील. तेथे स्थानिक लोकांशी संवाद, यात्रा आणि धर्मस्थळांवर दर्शन, पूजापाठ करतील. यामागे उत्तर आणि दक्षिणमध्ये संबंध आणखी दृढ करणे हा आहे.
आंध्रमध्ये नारा लोकेश ४००० किमी युव गलम यात्रेवर : आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डींना आव्हान देण्यासाठी टीडीपी आणि अभिनेता ते नेते बनलेल्या पवन कल्याणांचा पक्ष जनसेना सोबत आला आहे. कल्याण यांनी राज्याची यात्रा पूर्ण केली आहे. चंद्राबाबू नायडूंच्या अध्यक्षतेखालील टीडीपी पुन्हा एनडीएमध्ये यावी, अशी त्यांची इच्छा आहे. तथापि, भाजप यावर काहीही बोलत नाही. दुसरीकडे, टीडीपी सरचिटणीस आणि नायडूंचे पुत्र नारा लोकेश ४,००० किमीची युव गलम यात्राेवर निघाले आहेत. शुक्रवारी ८ व्या दिवशी ही यात्रा बंगरुपालयमला पोहोचली. तेथे पोलिसांनी त्यांचे वाहनही जप्त केले. तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांनी पक्षाला राष्ट्रीय नाव देऊन राजकीय महत्त्वाकांक्षा प्रकट केली आहे. दुसरीकडे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींच्या भगिनी शर्मिला रेड्डींनी तेलंगणमध्ये २ फेब्रुवारीपासून प्रजा प्रस्थानम पदयात्रेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. तर केसीआर यांच्याविरोधात भाजप १० राज्यांत ११,५०० बैठका घेणार आहे.
भाजपचे जनस्पंदन, जेडीएसची पंचरत्न रथयात्रा भाजप कर्नाटकात माजी मुख्यमंत्री बी.ए. येदियुरप्पा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वात जनस्पंदन यात्रा काढत आहेत. आतापर्यंत दोन्ही नेत्यांनी ६ जिल्हे पादाक्रांत केले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष एचडी कुमारस्वामी जानेवारीपासून पंचरत्न रथयात्रा काढत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांची यात्रा दावणगिरीत पोहोचली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.