आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:एम्स दिल्लीत संपकरी नर्सना बळाचा वापर करून हटवले, गंभीर दुखापती

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
कोरोना देशात आला होता तेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांवर फुले, आता.. - Divya Marathi
कोरोना देशात आला होता तेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांवर फुले, आता..
  • कोरोना देशात आला होता तेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांवर फुले, आता कोरोनाचा खात्मा होऊ पाहतोय
  • देशाने ठरवावे, आम्हाला ही वागणूक योग्य नाही : नर्सिंग युनियन

हे छायाचित्र आहे दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान (एम्स) संस्थेतील. येथे वेतनातील तफावतीमुळे नर्सिंग स्टाफ सध्या संपावर आहे. मंगळवारी काेरोनाच्या या काळात संपकरी नर्सिंग कर्मचारी घोषणाबाजी करत व्यवस्थापन विभागाकडे दाद मागण्यासाठी जात असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बळाचा वापर करून त्यांना अडवले. या वेळी झालेल्या झटापटीत एका नर्सला गंभीर दुखापत झाली. एम्स नर्सिंंग युनियनचे अध्यक्ष हरीश काजला म्हणाले, “देशाला आज आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही कोरोनाकाळात दिवस-रात्र योद्ध्यासारखे काम केले आहे. आता आम्ही हक्क मागतोय तर एम्स प्रशासन बळाचा वापर करून आमचा आवाज दाबू पाहते आहे.’

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser