आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयोध्येतील राम मंदिराला पोलिस दलाहून जास्त बलशाली सुरक्षा देण्यात येणार आहे. दरवाजा परिसरात टेहळणीसाठी फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. संपूर्ण मंदिरात ८०० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. आकाशातून २४ तास ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येईल. मंदिराच्या सुरक्षेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पूर्ण वापर करता यावा यासाठी ७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे ट्रस्टी डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले की, पोलिस आपल्या कामाचे नियोजन करत आहेत. ही त्यांची जबाबदारी आहे. ट्रस्ट भाविकांना सुलभ दर्शनाबरोबर मंदिरात आत उत्तम सुरक्षा पुरवणार आहे. ट्रस्टने आपला एक सुरक्षा सल्लागारही नियुक्त केला आहे. तो दोघांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम करेल. उत्तर प्रदेशचे डीजीपी आर.के. विश्वकर्मा यांनी सांगितले की, मंदिर निर्माणानंतर गर्दी चार ते पाचपट वाढेल. त्यामुळे स्वयंचलित शॉटगन, बुलेटप्रूफ जॅकेट, टेहळणी उपकरणे आणि शरयू नदीत तैनात करण्यात येणाऱ्या चिलखती बोट आदींची खरेदी करण्यात येणार आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, नव्या सुरक्षा व्यवस्थेनंतरही १९९२ नंतर राम जन्मभूमी परिसरातील सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा दल कायम राहील. त्यात १८ कंपनी पीएसी आणि ६ कंपनी सीआरपीएफ तैनात आहेत. त्यात एक महिला आरपीएफ कंपनी आहे. त्याशिवाय एक एडीएम, एक एएसपी, ३ डेप्युटी एसपींचा समावेश आहे. १९९३ पासून परिसराच्या सुरक्षेसाठी १७०० पोलिस तैनात आहेत. मंदिराजवळ ३६ ते ५० बॅरिकेडिंग आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.