आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Stuck In A Basement 200 Meters From Jelensky's Office; Surrounded By Tank missiles, Can't Even Get Out

यूक्रेन राष्ट्रपती भवनाजवळ अडकले भारतीय:जेलेंस्की यांच्या ऑफिसपासून 200 मीटर अंतरावर बेसमेंटमध्ये अडकले; टँक-मिसाइलने घेरले, बाहेरही निघता येत नाही

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या चार दिवसांपासून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की यांच्या कार्यालयापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर असलेल्या तळघरात पाच भारतीय अडकले आहेत. या भागात राष्ट्रपती भवनाशिवाय सर्व मंत्रालये देखील आहेत, त्यामुळे येथे प्रत्येक कोपऱ्यात युक्रेनचे सैन्य तैनात आहे. रणगाडे आणि क्षेपणास्त्रांसह सैनिक सज्ज आहेत. बाहेर इमर्जन्सी आहे त्यामुळे कोणीही बाहेर जाऊ शकत नाही.

ऋषिकेशचे रहिवासी हरीश पुंदीर यांनी भास्करला सांगितले की, 'माझ्यासह एकूण 5 जण आहेत. मी ज्या रेस्टरॉमध्ये शेफ आहे, ते येथेच आहे. रेस्टॉरंटच्या खाली एक तळघर आहे, जिथे आम्ही लपलो आहोत.'

हरीश 2019 पासून युक्रेनमधील एका रेस्टरॉमध्ये शेफ म्हणून काम करत आहे. त्याच्यासोबतचे लोकही रेस्टॉरंटमध्ये काम करतात. त्यापूर्वी ते रशियात काम करायचे.

हरीश यांनी सांगितले की, आम्हाला खाण्या-पिण्याची काहीच अडचण नाही. कारण रेस्तरॉचे साहित्य भरलेले आहे. मात्र टँक आणि मिसाइल चारही बाजूंनी फिरत आहेत, यामुळे जीव सुरक्षित आहे.

रशियन सैन्याला राष्ट्रपती भवनावरच ताबा घ्यायचा आहे, त्यामुळे हा परिसर आमच्यासाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. रशियन सैन्य राष्ट्रपती भवनापासून अवघ्या 8 ते 10 किमी अंतरावर आहे. हरीश सांगतात, 'जेव्हा रात्री गोळीबार होतो, तेव्हा त्याचे आवाज आतपर्यंत येतात. म्हणूनच आम्ही दोन-दोन करुन झोपत आहोत. संधी मिळताच आम्ही येथून निघू.

दूतावासाने म्हटले, तुमची व्यवस्था स्वतः करा
कीवमध्येच, सुमारे 300 विद्यार्थ्यांचा एक गट एका शाळेत अडकला आहे. या ग्रुपमध्ये सामील असलेला अमृतसरचा मनिंदर म्हणाला, 'भारतीय दूतावासाला लागून एक शाळा आहे, ज्याच्या तळघरात 300 हून अधिक विद्यार्थी आहेत.

'दूतावासाने आम्हाला येथून जाण्यास सांगितले आहे, परंतु कोणतीही व्यवस्था केली नाही. म्हणूनच आम्ही ही शाळा सोडत नाहीये. आम्हाला सीमाभागात जायचे आहे, तिथून भारतासाठी फ्लाइट मिळू शकते, पण तिथे कसे पोहोचायचे, काही समजत नाही.'

म्हणाले- ट्रेनने पाठवू, स्टेशनवर गेलो तर कोणीच सापडले नाही
शनिवारी, दूतावासाकडून सांगण्यात आले की त्यांनी ट्रेनच्या 3 बोगी बुक केल्या आहेत, जेणेकरून आम्ही कीवमधून निघू शकू आणि दूतावासाचे अधिकारी तुम्हाला स्टेशनवर मदत करतील असेही सांगितले.

त्यांचे म्हणणे ऐकून आमचा 80 विद्यार्थ्यांचा ग्रुप कसातरी स्टेशनवर पोहोचला, पण तिथे ना ट्रेन मिळाली ना दूतावासाचा कोणीही अधिकारी मिळाला. आम्ही त्यांच्या फोनवर फोन केला तर तेही बंद येत होते. त्यानंतर पुन्हा शाळेच्या तळघरात आलो.

रात्री बत्ती होते गुल
येथे आम्हाला दोनवेळचे जेवण दिले जात आहे. एका प्लेटमध्ये 5 ते 6 लोक खातात. रात्री बत्तीही गुल होते. परिस्थिती सामान्य होईपर्यंत तळघरातून बाहेर पडू नका, असे कुटुंबीयांनी सांगितले आहे. आमच्यासोबत अडकलेले बहुतांश विद्यार्थी मेडिकलच्या अभ्यासासाठी युक्रेनमध्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...