आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात मान्सूनने ८ दिवस आधीच वर्दी दिली खरी; परंतु आता ८ दिवसांपासून तो कर्नाटकच्या कारवार परिसरात अडकला आहे. येत्या ४-५ दिवसांपर्यंत वेगाने पुढे सरसावण्याचीही शक्यता कमी आहे. त्यामुळे देशाच्या मध्य, उत्तर आणि पश्चिम राज्यांत काही दिवस उशिराने दाखल होऊ शकतो. मात्र, मंगळवारी तामिळनाडूच्या खालील भागांत मोसमी पाऊस सुरू झाला. ८ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण तामिळनाडू ओलांडून आंध्र प्रदेशपर्यंत पोहोचायला हवा होता. उदाहरणार्थ मुंबईत १० जून रोजी मान्सून पोहोचतो. या वेळी मंदावलेल्या वेगामुळे त्यात उशीर होण्याची शक्यता आहे.
समुद्रात कोणत्याही प्रकारचे वादळ किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाही. यामुळे मान्सूनचा वेग मंदावला आहे. दुसरीकडे, देशात मान्सूनपूर्व पाऊसही आतापर्यंत खूप कमी झाला आहे. ७ जूनपर्यंत भारतात मान्सूनपूर्व पाऊस ३७% कमी झाला. ईशान्येतील राज्यांत सतत पाऊस सुरू आहे,अशा वेळची ही स्थिती आहे. वायव्य प्रांताचा विचार केल्यास मान्सूनपूर्व पाऊस आतापर्यंत ९४% कमी झाला आहे. याच कारणामुळे उत्तर आणि मध्य भारतात पुन्हा उष्णतेची लाट सुरू झाली. ही २-३ दिवसांपर्यंत राहू शकते.
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर आजपासून वाढणार
राज्यातील बारा जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाचा जोर आजपासून (दि.८) वाढणार आहे. विदर्भातील उष्णतेची लाट आता ओसरणार असून चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज नागपूर हवामान वेधशाळेने वर्तवला आहे.
मान्सूनची वाटचाल मंदावली असून तो अद्यापही गोव्याच्या सीमेवर आहे. दरम्यान, राज्यात कोल्हापूर, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, नाशिक, चंद्रपूर, वर्धा, यवतमळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भात उष्णतेची लाट ओसरणार जरी असली तरी सोमवारी येथे गोंदियात ४५.८ तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच येथील ९ शहरांतील तापमान हे चाळिशीपार होते.
निर्सगाशी छेडछाडीचा परिणाम
दिल्लीत केवळ १८ किमी अंतरात ८.५ अंशाचा फरक
दिल्लीच्या लोधी रोड येथील हवामान भवन केंद्रात किमान तापमान २५.२ अंश नोंदल. पीतमपुरा केंद्रावर किमान तापमान ३३.७ अंश नोंदले. हवामान शास्त्रज्ञ आर.के. जेनामनी म्हणाले, केवळ १८ किमी अंतरावर रात्रीच्या तापमानात एवढा फरकाचे कारण “अर्बन हिट आयलंड’ चा परिणाम आहे. दाट लोकवस्तीत रात्रीचे तापमान अपेक्षेपेक्षा जास्त असते. कारण, उंच इमारतींमुळे हवा खेळती राहत नाही. दिवसाच्या तापमानानंतर उष्णता तेथेच अडकते. काँक्रिटने आच्छालेली जमीन आणि इमारती उष्णता शोषून ठेवते. सोबत एसी आणि उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरामुळे असे भाग उष्णतेचे टापू म्हणजे “अर्बन हीट आयलंड’ होतात. दुसरीकडे, वृक्षांची संख्या जास्त असलेल्या लोधी रोड परिसरात हिरवळ आणि इमारतींत हवा खेळण्यासाठी पुरेसी जागा आहे.
पूर्व मोसमी पाऊस: महाराष्ट्रात ८५% तर गुजरातमध्ये ९०% पर्यंत कमी पाऊस
गुजरात -100%
मध्य प्रदेश -99%
राजस्थान -99%
उत्तराखंड -99%
पंजाब -99%
दिल्ली -99%
हरियाणा -98%
छत्तीसगड -97%
हिमाचल प्रदेश -97%
यूपी -97%
महाराष्ट्र -85%
झारखंड -82%
गोवा -81%
तेलंगण -68%
केरळ -48%
बिहार -31%
प. बंगाल -10%
कर्नाटक -6%
आंध्र प्रदेश -1%
तामिळनाडू +21%
पुढे काय ? उष्णतेच्या लाटेपासून ३ दिवसांनंतर दिलासा मिळण्याची शक्यता
पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, झारखंडमध्ये बुधवारी उष्णतेची लाट चालेल. येत्या तीन दिवसांत तापमान २-३ अंशांनी कमी होऊ शकते. बिहार, झारखंड, प.बंगालच्या काही भागांत ५ दिवसांपर्यंत पावसाची शक्यता आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू व ईशान्येतही मुसळधार पाऊस होऊ शकतो.
अन्य राज्यांत ४-५ दिवस उशिराने येण्याची शक्यता
ईशान्य राज्यांत मान्सून २ जून रोजी पोहोचला होता. त्यानंतर प.बंगालच्या हिमालय क्षेत्रात ठरलेल्या तारखेच्या एक आठवडा आधी पोहोचला. मात्र, चार दिवसांपासून सिलिगुडीच्या आसपास अडकला आहे. म्हणजे, दक्षिणेत अडकला आहे. पूर्वेतही रखडला. यामुळे अन्य राज्यांत हा ४-५ दिवस उशिरा पोहोचू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.