आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. डोक्यावर पडल्याने त्याची प्रकृती नाजूक आहे. या विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वीच वर्गातील आपल्या मित्रांसोबत एक 'रील' तयार केली होती. याची माहिती मिळाल्यानंतर शिक्षकाने त्याला शिक्षा म्हणून जमिनीवर बसवले होते.
या विद्यार्थ्याने गृहपाठ केला नव्हता. यामुळेही तो परेशान होता. पुन्हा शिक्षा मिळेल या भीतीने तो वर्गाबाहेर गेला व काही कळण्याच्या आत त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. बन्नादेवी ठाणे हद्दीतील इंग्राहम शाळेत ही घटना घडली.
अचानक उठला व रेलिंगवरून उडी मारली
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उजेडात आले आहे. त्यात दुसऱ्या मजल्यावरील वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्या तपासत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षिकेच्या बाजूलाच फरशीवर 2 विद्यार्थी बसले आहेत. त्यातील एक विद्यार्थी मयंक अचानक उठतो व रेलिंगवरून उडी मारतो.
टीचरसह 5 विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवला
बन्नादेवी ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कुमार यांनी सांगितले - विद्यार्थी गृहपाठ न केल्याने घाबरला होता. यामुळेच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी एका शिक्षिकेसह 5 विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्यात आलेत. विद्यार्थ्यावर जेएन मेडिकल कॉलेजच्या आयसीयूत उपचार सुरू आहेत.
विद्यार्थ्याचा गृहपाठ अर्धवट होता
इंग्राहम शाळेचे संचलाक SN सिंह म्हणाले- वर्गात उर्दूच्या टीचर शिकवत होत्या. मयंकने अर्धवट गृहपाठ केला होता. आपला नंबर येत असल्याचे पाहून त्याने उठून थेट उडी मारली.
मयंकने का उडी मारली, हे अद्याप समजले नाही. पण सीसीटीव्हीत तो अचानक उठून उडी मारताना दिसून येत आहे. पोलिसांनी शालेय कर्मचाऱ्यांपासून मयंकच्या मित्रांचाही जबाब नोंदवला आहे.
संचालक SN सिंह म्हणाले- खाली पडल्यामुळे विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर इतर विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. खिडकीतून पाहिले असता मयंक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. शिक्षकाने मुलाच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस व नातेवाइकांना सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. त्यात विद्यार्थी स्वतःहून उडी मारताना दिसत आहे.
वडिलांचा आरोप- सीनियर विद्यार्थी व शिक्षक चिडवतात
मयंकचे वडील संजीव कुमार सिंह यांनी सांगितले की, त्यांना रात्री 9 च्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने शाळा गाठली. शाळेतील क्रीडा स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जात होती. त्यात 5 दिवसांपूर्वी माझा मुलगा पास झाला होता. पण काही सीनियर विद्यार्थी व शिक्षक त्याला चिडवत होते. ते त्याच्यावर शर्यतीतून माघार घेण्यासाठी दबाव टाकत होते.
ते म्हणाले- शाळेच्या मैदानात अंतिम चाचणी सुरू होती. तो तेथे न पोहोचल्याने क्रीडा शिक्षकांनी त्याच्याविषयी विचारणा केली. पण एक शिक्षक व काही सीनियर विद्यार्थी त्याला जाऊ देत नव्हते. त्यामुळे त्याने कसेतरी त्यात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. पण त्याला रोखण्यात आले. याच प्रयत्नांत तो दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्याने हेतुपुरस्सर उडी मारली नाही. मी या प्रकरणी पोलिसांकडे लेखी तक्रार करणार आहे.
कुटुंबाकडून तक्रार दाखल नाही
इन्स्पेक्टर बन्नादेवी प्रदीप कुमार यांनी सांगितले की, गृहपाठ न केल्यामुळे मुलगा घाबरला होता. भीतीपोटी त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शिक्षक व 5 विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्यात आलेत. या प्रकरणी कुटुंबाकडून अद्याप कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झाली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.