आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7वीच्या विद्यार्थ्याला जमिनीवर बसवले:'भारत माता की जय' म्हटल्यामुळे मिशनरी शाळेने दिली शिक्षा; 2 शिक्षकांवर FIR

भोपाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशाच्या गुना स्थित एका मिशनरी शाळेत विद्यार्थ्याने 'भारत माता की जय'चा नारा दिल्यामुळे मोठा वाद झाला आहे. शाळा प्रशासनाने 7वीच्या या विद्यार्थ्याला हा नारा दिल्याप्रकरणी केवळ धारेवरच धरले नाही, तर त्याला पुढील 4 तास जमिनीवरच बसवले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंदू नेते व पालकांनी शाळेत गदारोळ केला. त्यानंतर या प्रकरणी 2 शिक्षकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

गुनाचे रहिवासी रोहित जैन यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा क्राइस्ट स्कूलमध्ये इयत्ता 7वीत शिकतो. बुधवारी शाळेतील प्रार्थनेनंतर त्याने 'भारत माता की जय'चा नारा दिला. यामुळे तेथील शिक्षक संतप्त झाले. मुलाला सलग 4 पीरियड जमिनीवर बसण्याची शिक्षा दिली. त्याला धमकावले. याने त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला की, त्याने स्वतःला एका खोलीत बंद करवून घेतले. आम्ही त्याचे हावभाव पाहून त्याला विचारले असता, त्याने संपूर्ण घटना सांगितली.

क्राइस्ट स्कूलमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह इतर हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.
क्राइस्ट स्कूलमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह इतर हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.

पालक व हिंदू संघटनांची निदर्शने

पालक, एबीव्हीपी, बजरंग दल व इतर सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास शाळेत पोहोचले. तिथे पोहोचून त्यांनी जोरदार निदर्शने केली. ते शालेय परिसरात धरण्यावर बसले. त्यांनी नारेबाजी करताना हनुमान चालीसाचे पठण केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शालेय व्यवस्थापनाने या प्रकरणी लेखी माफी मागितली. तसेच संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याचीही ग्वाही दिली. त्यानंतर सामाजिक संघटनांनी शालेय प्रशासनावर एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. SDM व CSP नेही प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत गदारोळ सुरीूच होता. अखेर अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर प्रकरण शांत झाले.

माजी नपाध्यक्षांनी घेतली धाव

दुसरीकडे, माजी आमदार व माजी नपाध्यक्ष राजेंद्र सिंह सलूजा काही दस्तावेज घेऊन शाळेत पोहोचले. त्यांनी सांगितले की, शालेय प्रशासनाने कॅम्पसच्या आतील सरकारी जमिनीवर अवैध नियंत्रण मिळवले आहे. त्यांनी एसडीएमकडे जमिन मुक्त करण्याची मागणी केली. तसेच ते खसरा खतौनी घेऊनही पोहोचले. सलूजाही समर्थकांसह धरण्यास बसले. सलूजा म्हणाले की, भारत माता की जय येथे बोलणार नाही तर कुठे बोलणार. असा व्यवहार सहन केला जाणार नाही.

या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राजेंद्र सलूजा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शालेय परिसरात धरणे दिले. हनुमान चालीसाचे पठणही केले. त्यांनी शाळेवर सरकारी जमिनीवर अवैध ताबा मिळवल्याचा आरोप केला.
या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राजेंद्र सलूजा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शालेय परिसरात धरणे दिले. हनुमान चालीसाचे पठणही केले. त्यांनी शाळेवर सरकारी जमिनीवर अवैध ताबा मिळवल्याचा आरोप केला.

2 शिक्षकांविरोधात गुन्हा

निदर्शनानंतर कोतवालीत शिक्षक जस्टिन व जास्मिना खातून यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. प्रशासनानेही शाळेच्या जमिनीचे मोजमाप केले. त्यात एक बीघा सरकारी जमिन शाळेने बळकावल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी सकाळी सरकारी जमिन मुक्त करण्याची कारवाई करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...