आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉलमधून चॉकलेट चोरले:मॅनेजरने केली मारहाण, मुलाने केली आत्महत्या

मुलगी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या बेतिया येथील एका मॉलमधून 12 वर्षांच्या एका मुलाने 20 रुपये किंमतीचे चॉकलेट्स चोरले असता व्यवस्थापकाने त्याला पकडून मारहाण केली. यानंतर या मुलाने विष प्राशन करत आत्महत्या केली. या घटनेच्या काही तासांनंतर मुलाचा मृतदेह सापडला. ही घटना 2 मेची आहे. मॉलमध्ये मुलाला बेदम मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.

हा विद्यार्थी 2 मे रोजी एका मॉलमध्ये गेला होता. तिथून त्याने 20 रुपये किंमतीचे डेअरी मिल्क चॉकलेट चोरल्याचा आरोप व्यवस्थापकाने केला. स्टोअर मॅनेजरने मुलाचे हे कृत्य पाहून त्याला पकडून बेदम मारहाण केली.

मॅनेजरने आधी वडिलांना फोन केला. फोन लागला नाही तेव्हा त्याने त्याची बॅग आणि सायकल जवळ ठेवून घेतली. मॉलमधून बाहेर पडल्यानंतर मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. मुलगा 12 वाजता मॉलमधून निघाला होता. दुपारी तीनच्या सुमारास त्याचा मृतदेह मॉलपासून थोड्या अंतरावर आढळून आला.

हे प्रकरण चनपटिया पोलीस स्टेशन परिसरातील टिकुलिया चौकीशी संबंधित आहे. विद्यार्थ्याचा मृतदेह साखर मिलच्या मैदानात आढळून आला. मृतदेहाजवळ कीटकनाशक औषध पडलेले होते. मुलगा एका खासगी शाळेत सहाव्या वर्गात शिकत होता.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगा व्यवस्थापकाची माफी मागताना दिसतो

या संपूर्ण घटनेचे 42 सेकंदांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, स्टोअर मॅनेजर पवन दुबे एका खुर्चीवर तर दुसऱ्या खुर्चीवर विद्यार्थी बसला आहे. स्टोअर मॅनेजरने दोन्ही हातांनी मुलाच्या दोन्ही गालावर चापट मारली. तो एकामागून एक चार-पाच थप्पड देतो. मॅनेजरच्या टेबलावर चॉकलेट दिसत आहे. मारहाणीदरम्यान मुलागा कान धरून व्यवस्थापकाची माफीही मागताना दिसत आहे. यावेळी तिथे एक गार्डही असतो.

मॅनेजरने मुलाच्या वडिलांना 3-4 वेळा फोन केला. थोड्या वेळाने घरच्यांशी बोलला. मॅनेजरने वडिलांना सांगितले की तुमच्या मुलाने आमच्या मॉलमधून चॉकलेट चोरले आहे. तुम्ही मॉलमध्ये या, मात्र 2 मे रोजी चार वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांच्या मुलाचा मृतदेह साखर मिलच्या मैदानात पडून असल्याची माहिती मिळाली.

यानंतर वडिलांनी त्याच दिवशी मॉलच्या व्यवस्थापकासह अन्य दोन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि मुलाचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर मॉल बंद आहे आणि सर्व कर्मचारी फरार आहेत.

या मॉलमध्ये चॉकलेट चोरल्याचा मुलावर आरोप होता.
या मॉलमध्ये चॉकलेट चोरल्याचा मुलावर आरोप होता.

स्टोअर मॅनेजर फरार

सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली असावी, अशी भीती व्यक्त होत आहे. घटनेपासून स्टोअर मॅनेजर फरार आहे. पोलीस सध्या स्टोअर मॅनेजरचा शोध घेत आहेत.

स्टोअर मॅनेजरच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या

सदर एसडीपीओ महताब आलम यांनी सांगितले की, विद्यार्थी गोपालपूर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. विषबाधेमुळे मुलाचा मृत्यू झाला. मॉलमधून छुप्या पद्धतीने चॉकलेट उचलल्याचा आरोप असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्याची दप्तर व सायकल ठेवून घेतली होती. यामुळे त्यांने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये विष असल्याची पुष्टी झाली आहे.

स्टोअर मॅनेजर आणि इतरांवर एफआयआर दाखल

विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून 2 मे रोजीच चनपटीया पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. स्टोअर मॅनेजर पवन दुबे व इतरांची आरोपी म्हणून नावे आहेत. पोलीस ठाण्याचे प्रमुख मनीष कुमार यांनी सांगितले की, पवन दुबे हा शिकारपूर पोलीस ठाण्याच्या हरसारी परनिया गावातील रहिवासी विजय दुबे यांचा मुलगा आहे. अटकेच्या भीतीने तो फरार आहे.