आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतीय विद्यार्थ्यांची अवस्था चांगली नाही. केंद्र सरकार आणि दूतावासाने त्यांना पोलँड, रोमानिया आणि हंगेरी सीमेपर्यंत येण्याचा सल्ला दिला आहे. तेथे पोहोचल्यानंतरही विद्यार्थी 12 तासांपेक्षा जास्त काळापासून अडकलेले आहेत. त्यांना काढण्याची कोणतीही व्यवस्था नाही. युक्रेनच्या कीव, खारकीवनंतर आता बॉर्डरवर अडकलेले विद्यार्थी व्हिडिओ पाठवून आपली समस्या मांडत आहेत.
p रशिया-युक्रेन युद्धाने भारतीय विद्यार्थ्यांसाठी अडचणी निर्माण केल्या आहेत. युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय विद्यार्थी आहेत असे सांगितले जात आहे. जे वेगवेगळ्या शहरात शिकत आहेत. युद्धाची परिस्थिती पाहता यूक्रेनचे नागरिक शहर सोडून पळत आहेत, अशा वेळी भारतीय विद्यार्थी घाबरले आहेत. दरम्यान केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून विद्यार्थांना पोलँड, हंगेरी आणि रोमानिया सीमा येथे पोहोचण्यासा सल्ला दिला. तेव्हा विद्यार्थी कसे बसे बस आणि टॅक्सी करुन किंवा पायी बॉर्डरवर पोहोचले.
आता मोठ्या संख्येत विद्यार्थी बॉर्डरवर अडकले आहेत. एक विद्यार्थी पुलकित श्रीवास्तवने व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले की, बॉर्डरवर पोहचण्यास त्याला खूप त्रास झाला. आता मोठ्या संख्ये विद्यार्थी बॉर्डरवर पोहोचले आहेत. त्यांना बाहेर काढण्याची कोणतीही सुविधा नाही. गेल्या 12 तासांपासून बॉर्डरवर विद्यार्थी अडकले आहेत आणि तिथून बाहेर पडण्यासाठी परवानगीची अपेक्षा करत आहेत. p दूतावासाच्या सल्ल्यावर काम करा खरेतर, विद्यार्थ्यांना जशी बातमी मिळाली की, केंद्र सरकारने पोलंड, हंगेरी आणि रोमानिया सीमेवरील मुलांना बाहेर काढण्याची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मुलांना ही देखील माहिती मिळाली की, तेथे बॉर्डरवर पोहोचल्यानंतर त्यांना काढून टाकले जाईल. तेव्हा यूक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी स्थानिक एजेंटच्या मदतीने दूतावासाला सूचना दिल्याशिवायच बॉर्डरपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली. दूतावासाने विद्यार्थ्यांना यूक्रेनच्या पश्मिची शहरांकडे जाण्याचा सल्ला दिला होता.
अचानक बॉर्डरवर विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी भारतीय दूतावासाने एडवाइजरी जारी केली आहे की, शेजारील देश पोलंड, हंगरी आणि रोमानियाच्या भारतीय दूतावास त्यांना बाहेर काढण्यासाठी सलग प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थिती पूर्वी सूचनेशिवाय कोणत्याही भारतीयाने बॉर्डरवर जाऊ नये. यामुळे त्यांना बाहेर पडण्यास समस्या उद्भवू शकते. p 25-30 किलोमीटर पायी चालून पोहोचले पोलँड बॉर्डरवर पोलँड बॉर्डवर पोहोचलेल्या विद्यार्थ्याने देखील एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले की, पोलँडच्या भारतीय दूतावासाच्या सूचनेवर ते आपल्या जवळच्या साधनाने बॉर्डरपासून लांब पोहोचले आहे. लांब रांगा असल्यामुळे त्यांना 25 ते 30 किलोमीटर पायी चालून बॉर्डरपर्यंत पोहोचावे लागले. आता त्यांना बॉर्डरवर भटकावे लागत आहे. तिथे व्हॅनने 8-10 च्या संख्येत बाहेर पडण्याची व्यवस्था केली गेली आहे.
p जिथे आहात, तिथेच सुरक्षित राहा यूक्रेनमध्ये भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे की, सूचनेशिवाय कोणाच्याही म्हणण्यावरुन बॉर्डरवर जाऊ नका. यामुळे तुम्हाला समस्या उद्भवू शकते. भारतीय नागरिक जिथे असतील त्यांनी तिथेच राहावे. हेच तुमच्यासाठी सुरक्षित राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.