आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Students, No Exams, No Degree : UGC, State Governments Order Cancellation Of Exams: Court

अंतिम वर्षाच्या परीक्षा:विद्यार्थ्यांनो, परीक्षा नाही तर पदवीही नाही : यूजीसी, राज्य सरकारे परीक्षा रद्द करण्याचा आदेश देऊ शकतात का : न्यायालय

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोर्टबाजीत परीक्षा होणार नाही या भ्रमात राहू नका

कोरोनाच्या प्रकोपामुळे महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. याबाबत सोमवारी सुप्रीम कोर्टाला माहिती देण्यात आली. यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हरकत घेत विद्यार्थ्यांना सांगितले की, त्यांनी परीक्षेची तयारी करून ठेवावी, प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे असा विचार करू नये. त्यांनी लक्षात घ्यावे की, परीक्षा न देता त्यांना कोणत्याही स्थितीत पदवी मिळणार नाही हाच कायदा आहे.

उच्चशिक्षण संस्थांमधील परीक्षांबाबत अशाेक भूषण, आर. सुभाष रेड्डी व एम.आर. शहा यांच्या पीठाने यूजीसीला विचारणा केली की, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यूजीसीचा कायदा बाजूला ठेवून परीक्षा रद्द करू शकते की नाही? यूजीसीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, सर्व महाविद्यालयांमधील परीक्षा घेण्याचा व त्यांना स्थगित करण्याचा अधिकार यूजीसीलाच आहे. या अधिकारात राज्ये त्यांच्या इच्छेने यूजीसीच्या परवानगीशिवाय हस्तक्षेप करू शकत नाहीत.

कोर्टबाजीत परीक्षा होणार नाही या भ्रमात राहू नका
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, महाराष्ट्र व दिल्ली सरकारांनी कोरोनाचे कारण देत महाविद्यालये व विद्यापीठांत पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यांना याबाबत सविस्तर उत्तर सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात यावा. विद्यार्थ्यांनी भ्रमात राहू नये की, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने परीक्षा होणार नाहीत. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सज्ज राहायला हवे.

0