आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात आणि देशात सर्वोच्च महिद्यालयांमध्ये आता प्रवेश मिळवण्यासाठी घेण्यात येणाऱ्य़ा नीट युजी परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे नीट युजीच्या विद्यार्थांना दिलासा मिळणार आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी होणारी ही नीट युजी परीक्षा जुलैमध्ये आयोजित केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे आयोजित करण्यात येते. लवकरच यासंदर्भातली अधिकृत सुचना जारी करू शकते असे देखील सांगण्यात आले आहे. नीट युजीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी नीटच्या अधिकृत वेबसाईट वरneet.nta.ntc.in जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करू शकतात.
आता नीट युजीची परिक्षा देण्यासाठी वयोमर्यादा नाही नॅशनल मेडिकल कमिशनने NMC ने नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा रद्द केली असुन, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही वयोमर्यादा 25 तर राखीव प्रवर्गासाठी 30 वर्षे होती. आता हीच वयोमर्यादा नॅशनल मेडिकल कमिशनकडून रद्द करण्यात आली आहे.
मीडिया कडून मिळालेल्या अहवालानुसार, नीट युजी परीक्षा द्वारे एमबीबीएस 90,825, बीडीएस 27,894, आयुष 52,720, बीवीएससी आणि एएच 603 जागांवर प्रवेश दिला जातो. यांत 1,899 एम्स आणि 249 जिपमर जागांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या डिटेल्ससाठी वेबसाईटला भेट देत रहावी.
या कागदपत्रांची पडू शकते गरज
नीट युजी 2022 चे कन्फर्मेशन पेज लवकरच डिजिलॉकर वर जाहीर केले जाईल. कन्फर्मेशन पेजवर साइन अप करण्यासाठी विद्यार्थ्यांना डिजिलॉकर ॲप किंवा त्याची अधिकृत माहिती digilocker.gov.in या वेबसाईटवर मिळू शकेल. विद्यार्थी डिजिलॉकर ॲप्लिकेशन वर जाऊन सहज साइन अप करू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.