आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Students Who Fail The 9th And 11th Exams Will Get One More Chance, Schools Will Take Exams Online Or Offline In Their Own Way

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीबीएसई बोर्डाचा निर्णय:9वी आणि 11वीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळेल अजून एक संधी, शाळा आपल्या पद्धतीने ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षा घेतील

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीएसईने हा निर्णय केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या सल्ल्यानंतर घेतला

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई ) ने 9 वी आणि 11 वी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या सल्ल्यानंतर घेण्यात आला. निशंक यांनी कोरोना लॉकडाउनमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता जनरल प्रमोशन किंवा अजून एक संधी देण्यास सांगितले होते.

या निर्णयानंतर सीबीएसई संबंधित सर्व शाळेतील वर्ग 9वी आणि 11वीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नापास झालेल्या विषयांसाठी परत परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाइन / ऑफलाइन/ इनोवेटिव टेस्ट घेऊन पुढील वर्गात पाठवू शकतात. तसेच, मुलांना या परीक्षेसाठी ठराविक वेळ देण्यासही शाळांना सांगण्यात आले आहे.

1 एप्रिलला जनरल प्रमोशनबद्दल म्हटले होते

सीबीएसईकडून जारी नोटिसमध्ये कोरोना लॉकडाउनमुळे वर्ग 9वी आणि 11वीमधील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याचे म्हटले होते. सीबीएसईने आपल्या संबंधित सर्व शाळांना विद्यार्थ्यांकडून प्रोजेक्ट वर्क, घटक चाचण्या, सत्र परीक्षा यातील मार्क्स पाहून पुढील वर्गात विद्यार्थ्यांना पाठवण्यास सांगितले होते. 

निशंक यांनी केले होते ट्वीट

याबाबत निशंक यांनी गुरुवारी एक ट्वीट केले होते, त्यानंतर सीबीएसईने ट्वीट करत सर्व नापास विद्यार्थ्यांना परत संधी दिली जाईल, अशी माहिती दिली. यासंबंधी एक नोटीसदेखील जारी करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...