आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Students Will Be Doing Home Assignments From Today Onward, School Will Give Marks; NCERT's Optional Educational Calendar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवा निर्णय:विद्यार्थी आजपासून घरी असाइनमेंट करतील, शाळा गुण देतील; एनसीईआरटीचे पर्यायी शैक्षणिक कॅलेंडर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दर आठवड्याला मिळेल कॅलेंडर, शाळा सुरू झाल्यावर शिकवणार पुढील अभ्यासक्रम

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. हे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी एक पर्यायी शैक्षणिक कॅलेंडर काढले आहे. पहिली ते बारावीच्या वर्गापर्यंत हे कॅलेंडर आहे. मुले आज शाळेत गेली असती तर त्यांना काय शिकवले असते, याचा आधार घेत दर आठवड्याला कॅलेंडर काढले जाईल. शाळा उघडल्यानंतर पुढील शिक्षण सुरू होईल. या अंतर्गत मुले घरीच पालक आणि शिक्षकांच्या मदतीने शिक्षण सुरू ठेवू शकतील. एनसीईआरटीने कॅलेंडरमध्ये ई- शाळा, एनआरओईआर आणि दीक्षा पोर्टलवर पाठानुसार देण्यात आलेल्या ई-साहित्याच्या लिंक टाकल्या आहेत. हे पर्यायी कॅलेंडर देशातील सर्व शाळांसाठी आहे. ज्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नाही त्या विद्यार्थी किंवा पालकांना शिक्षक एसएमएस किंवा फोनद्वारे मार्गदर्शन करू शकतील. यासाठी विद्यार्थी शुक्रवारपासून व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करू शकतील.

देशातील सर्व शाळा पाळतील एनसीईआरटीचे हे कॅलेंडर

  • देशातील सर्व शाळा कॅलेंडर पाळतील. विद्यार्थ्यांसाठी सामुग्री त्याच शाळेचे शिक्षक तयार करतील. अडचण आल्यास विद्यार्थी, पालक त्या शिक्षकाशी फोनवर बोलून समजून घेतील.
  • पर्यायी कॅलेंडरच्या हिशेबाने असाइनमेंट- प्रोजेक्ट दिले जातील. विद्यार्थी तो गृहपाठासारखा पूर्ण करतील. जेव्हा शाळा उघडतील, शिक्षक मूल्यमापन विद्यार्थ्यांना गुण देऊ शकतील.
  • आज मुले शाळेत गेली असती तर काय शिकत असती, याचा विचार करून कॅलेंडर तयार केले आहे. स्थिती सामान्य झाल्यावर शाळा उघडल्यानंतर पुढील शिक्षण सुरू होईल.
  • एनसीईआरटीचे संचालक ऋषिकेश सेनापतींनी सांगितले की, विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही असाइनमेंटचा भाग व्हावे. हे कॅलेंडर पूर्णपणे करा आणि शिका पद्धतीने तयार करण्यात आले आहे.
  • कॅलेंडरमध्ये विविध क्रिया आहेत. मानसिक आरोग्य व शारीरिक शिक्षणही आहे. कला, संगीतातून तणाव दूर करण्याबाबत सूचनाही आहेत.

अभियांत्रिकी महाविद्यालयांनी शुल्कासाठी दबाव आणू नये, कर्मचारी काढू नयेत

एआयसीटीई : एआयसीटीईने देशातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि इतर तांत्रिक शिक्षण संस्थांना निर्देश दिले आहेत की, शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर सक्ती करू नये. लॉकडाऊनच्या काळात एखाद्या कर्मचाऱ्याला हटवले असेल तर त्याला पुन्हा कामावर घ्या आणि सर्वांना नियमित वेतन द्या. काही महाविद्यालये विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करत असल्याच्या तक्रारी होत्या.

बातम्या आणखी आहेत...