आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Stumbled 65 Times In Training, Removed By Army; The Court Told The Lieutenant Colonel That Your Son's Lifestyle Was Not Conducive To The Army

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:प्रशिक्षणात 65 वेळा अडखळला, लष्कराने काढून टाकले; कोर्ट लेफ्टनंट कर्नलला म्हणाले, तुमच्या मुलाची जीवनशैली सैन्यासाठी अनुकूल नाही

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • वडिलांची काेर्टाला विनंती : नरमाई दाखवा, मुलगा सैनिक कुटुंबातील चाैथी पिढी

आपला मुलगा ध्रुव जाखड याला त्याच्या आवडीनुसार काम करू द्या, त्याची जीवनशैली लष्कराला अनुकूल नाही, असा सल्ला दिल्ली हायकोर्टाने निकाल सुनावताना लष्कराचे लेफ्टनंट कर्नल पी.एस. जाखड यांना दिला. धुव्र लष्करात दाखल झाला, पण दाेन वर्षांत प्रशिक्षण पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने भारतीय लष्कर अकादमीने त्याला सैनिक प्रशिक्षण साेडण्याचा सल्ला दिला. ध्रुवने त्याविराेधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली. ध्रुवच्या वडिलांनीही आपला मुलगा हा लष्करी कुटुंबाच्या चाैथ्या पिढीचे नेतृत्व करत असल्याने त्याच्या विराेधात कडक निर्णय घेऊ नये, अशी विनवणी कोर्टाला केली होती.

सैन्यात अधिकारी हाेण्यासाठी ध्रुव जुलै २०१७ मध्ये कंबाइन डिफेन्स सर्व्हिसेसची परीक्षा उत्तीर्ण हाेऊन प्रशिक्षणासाठी दाखल झाला. महिनाभरातच तो १० दिवस रुग्णालयात भरती झाला. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण कसेबसे त्याने पूर्ण केले. २०१८ मध्ये द्वितीय टप्पा परीक्षेच्या आठवड्याआधी आयएमएने त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली. सध्याची कामगिरी बघता प्रशिक्षण का राेखू नये, अशी विचारणा केली. ७ मार्च २०१९ च्या आणखी एका नाेटिसीत ज्युनियर बॅचमधून का वगळू नये, असे विचारले. शेवटी त्याला दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण करण्याआधीच वगळण्यात आले. ९ नाेव्हेंबर २०१९ ला त्याच्या शारीरिक चाचणीच्या एक दिवस आधी ४० किलाे वाळू व विटांचे ओझे देऊन बटालियनच्या ड्यूटी अधिकाऱ्याच्या खाेलीसमाेर ३ तास उभे राहण्याची शिक्षा दिली. नंतर १९ नाेव्हेंबरच्या नोटिसीत अपयशी ठरल्यामुळे आयएमएमधून का वगळू नये अशी विचारणा केली. त्याविराेधात ध्रुवने हायकाेर्टात याचिका दाखल केली. तीन तास शिक्षा भाेगल्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण चाचणीत नापास झालो. त्यामुळे आयएमएमधून काढून टाकण्यासाठी बळजबरी करणे याेग्य नाही असे त्याने याचिकेत सांगितले.

कोर्ट म्हणाले- धडा घेऊन प्रगती कर, जे चांगले वाटेल तेच कर

ध्रुव याला शिक्षा का झाली? २०१७ ते २०१९ दरम्यान त्याला ६५ वेळा रेलिगेट (प्रशिक्षणात पुढे जाण्यापासून राेखणे) का केले, असा प्रश्न कोर्टाने केेला. आयएमए संस्थेच्या मते, ध्रुव लठ्ठपणामुळे शारीरिक चाचणी पूर्ण करू शकत नव्हता व अनेकदा गैरहजरही राहायचा. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई केली. कोर्टाने ध्रुवच्या वडिलांना निर्णय मान्य करण्याची सूचना केली. तसेच ध्रुवला आजवरच्या प्रशिक्षणातून धडा घेत आयुष्यात उत्तम जमेल तेच करण्याचा सल्लाही दिला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser