आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sub Lieutenant Kumudini Tyagi And Sub Lieutenant Riti Singh Deployed On Navy Warships, Raphael Will Soon Be The First Female Pilot

रणरागिणी:युद्धनौकेवरून पहिल्यांदाच हेलिकॉप्टर उडवणार 2 महिला अधिकारी, राफेललाही लवकरच पहिली महिला पायलट

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
सब लेफ्टनंट रीती सिंह (डावीकडून) आणि सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी.
  • नौदलात आजवर महिला अधिकाऱ्यांना फिक्स्ड विंग एअरक्राफ्टपर्यंत मर्यादित ठेवले होते

भारतीय नौदलाच्या इतिहासात प्रथमच सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रीती सिंह या महिला अधिकाऱ्यांना युद्धनाैकेवर तैनात केले जाणार आहे. दोघींची हेलिकॉप्टर स्ट्रीममध्ये ऑब्झर्व्हर (एअरबोर्न टॅक्टेशियन्स) पदासाठी निवड झाली. नौदलात आजवर महिला अधिकाऱ्यांना फिक्स्ड विंग एअरक्राफ्टपर्यंत मर्यादित ठेवले होते. दरम्यान, अंबालात वायु दलाच्या राफेल स्क्वॉड्रनलाही लवकरच पहिली महिला फायटर पायलट मिळू शकते. यांना आयएनएस गरुडमध्ये सोमवारी ऑब्झर्व्हर म्हणून तैनात झाल्याने विंग्जने सन्मानित करण्यात आले.