आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Subsidy On Canteen Food Served In Parliament Canteens Ends, It Will Save Rs 8 Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:संसदेच्या उपाहारगृहात अनुदान बंद, खासदारांना खाण्याचे पूर्ण पैसे द्यावे लागतील; 8 कोटी रुपयांची होईल बचत

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपाहारगृहातील अनुदान बंद करण्याचा सल्ला बिर्ला यांनी दिला होता, जो सर्व पक्षांनी मान्य केला

संसदेच्या उपाहारगृहात खासदार व इतरांना खाद्यपदार्थांवर दिले जाणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपाहारगृहातील खाणे महाग होईल. अध्यक्षांनी अधिवेशन तयारीबाबतच्या बैठकीत सांगितले, उपाहारगृह उत्तर रेल्वेऐवजी आयटीडीसी सांभाळेल. मात्र, त्यांनी याबाबतच्या आर्थिक मुद्द्यांची माहिती दिली नाही. सूत्रांनी सांगितले की, अनुदान बंद केल्याने लोकसभा सचिवालयाला वार्षिक सुमारे ८ कोटी रुपयांची बचत होऊ शकेल. उपाहारगृहातील अनुदान बंद करण्याचा सल्ला बिर्ला यांनी दिला होता, जो सर्व पक्षांनी मान्य केला.

सकाळी राज्यसभा, दुपारी लोकसभेचे कामकाज

केंद्राचे लसीकरण धोरण खासदारांना लागू होईल. खासदारांची २७-२८ जानेवारीला आरटीपीसीआर चाचणी होईल. २९ जानेवारीपासून राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत, तर लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत चालेल. १ तासाचा प्रश्नकाळ असेल.