आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यशोगाथा:14 व्या वर्षी शाळा सोडली, अनेक व्यवसायांत पदरी अपयश, सध्याचे सर्वात तरुण अब्जाधीश

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोर्ब्जने भारतातील सर्वाधिक 100 श्रीमंतांच्या यादीत बनवले स्थान

केवळ चौदाव्या वर्षी जेव्हा निखिल कामत यांनी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनी त्यांना अनेक सल्ले दिले असतील. आज तब्बल २० वर्षांनंतर ३४ व्या वर्षांच्या बंगळुरूमधील मालिका उद्योजकाने देशातील सर्वात तरुण अब्जाधीशाचे मानांकन पटकावले आहे. निश्चितच निखिल यांच्या यशाने हे दाखवून दिले आहे की त्यांचे हे मार्गक्रमण म्हणजे एक नियोजित धाडस होते जे फायदेशीर ठरले. परंतु त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या अनुभव कथनात ते म्हणतात की, मित्रांना पुढे जाताना पाहताना माझी ध्येयनिश्चिती अजून झालेली नसल्याने भीती वाटायची.

आपला खर्च निघावा म्हणून सुरू केले बुद्धिबळ खेळणे

त्यांच्याकडे पदवी नसल्याने आपल्या कोणी नोकरीवर घेणार नाही हे समजल्यावर त्यांनी आपल्या वयाच्या पाच वर्षांपासून खेळत असलेल्या बुध्दिबळ खेळालाच पैसे कमवण्याचे साधन बनवले. देशातील नामवंत खेळाडूंसमवेत दोन वर्षे बुद्धिबळातले अनेक सामने खेळल्यानंतर त्यांना हे समजून चुकले की, आपण या क्षेत्रात म्हणावे तितक्या उंचीपर्यंत जाऊ शकत नाही व त्यातून आपला चरितार्थही होणार नाही.

अनेक व्यवसाय कल्पनांवर नशीब आजमावण्याचा प्रयास

१७ व्या वर्षी अनेक व्यवसाय करताना बंधू नितीन कामत सोबत ट्रेडिंग सुरू केले. ज्यात असे अनुभव आले की, किरकोळ गुंतवणूकदारांना ब्रोकरेजसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क द्यावे लागते. यातून शिकवण घेत त्यांनी २०१० मध्ये देशातील पहिली ऑनलाइन डिस्काऊंट ब्रोकरेज जिरोधानामक कंपनी सुरू केली.

कोणत्याही जाहिरातीविना मिळवले एक यशस्वी स्थान

केवळ पाच लोकांना हाताशी घेत सुरू केलेली ही कंपनी आता देशातील सगळ्यात मोठी कंपनी बनलेली असून, यात २२ लाखांपेक्षा जास्त सक्रिय यूजर्स आहेत. तर ५ अब्ज ट्रेड्स दररोज नोंद होतात. इतकेच नव्हे तर निखील आणि त्यांचे बंधू नितीन यांना २०२० फोर्ब्जच्या देशातील सर्वाधिक १०० श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. निखील यांच्या मते त्यांनी हे स्थान कोणत्याही जाहिरातींविना मिळवलेले आहे.