आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदूर:400 किलाेच्या लठ्ठ व्यक्तीवर यशस्वी शस्त्रक्रिया

इंदूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राेहतक येथील दीपक यांच्या मणक्याला २००९ मध्ये झालेल्या अपघातात दुखापत झाल्याने त्यांचे चालणे-फिरणे बंद झाले. पलंगावर पडून पडून त्यांचे वजन नियंत्रणाच्या बाहेर गेले. ी ते पलंगावरच असल्याने त्यांचे प्रत्यक्ष वजन सांगणे कठीण हाेते. परंतु डाॅॅक्टरांच्या टीमने संपूर्ण अभ्यास केल्यानंतर त्यांचे वजन ४०० किलाेपेक्षा जास्त असल्याचे निश्चित केले. माेहक रुग्णालयाचे संचालक व मुख्य शल्यविशारद डाॅ. माेहित भंडारी यांनी २०१८ मध्ये ४१० किलाे वजनाच्या माॅरिशसमधील धर्मवीर यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली हाेती.

बॅरियॅट्रिक शल्य विशारद भंडारी म्हणाले धर्मवीर आॅपरेशन टेबलवर मावू शकले. पण दीपक यांच्या शरीराचा घेर जास्त असल्याने त्यांनी यांनी दाेन बेड जाेडून शस्त्रक्र्रिया केली ही अभूतपूर्व गाेष्ट आहे. दीपक यांना स्थूलतेशी संबंधित टाइप २ मधुमेह, उच्चरक्तदाब,अशा विविध समस्या हाेत्या. लठ्ठपणाच्या १५,००० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव असतानाही ही शस्त्रक्रिया माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक हाेती. शस्त्रक्रियेच्या आधी १५ दिवस त्यांना द्रवरूप आहार व आैषध दिल्यावर त्यांचे वजन २५ ते ३० किलाेने कमी झाले. शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त लांब उपकरण व विशेष सर्जिकल स्टेपलरची मदत घेतलीी.

४०० किलाेपेक्षा जास्त वजन असलेल्यांना हृदयाचा झटका व रक्त गाेठण्याचा धाेका जास्त असताे. पाेटाच्या जाडीमुळे तीन उपकरणे तुटली. दीपकवर स्लीव्ह गॅस्ट्रिक्टटाॅमी शस्त्रक्रिया करून पाेटातील पिशवीचा आकार कमी केला. अशा रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी ३० ते ४० लाख रुपये खर्च येतो. पण रुग्णाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शस्त्रक्रिया आैषधाच्या गाेळीच्या खर्चावरच झाली असे भंडारी म्हणाले. याआधी त्यांनी बडाेद्याच्या ३८३ किलाे पुरुष व भाेपाळच्या ३५० किलाे वजनाच्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.

बातम्या आणखी आहेत...