आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनावर संशोधन:जीन सायलेन्सिंग पद्धतीचाउंदरावर यशस्वी प्रयाेग, संशाेधनातून काेराेनाच्या उच्चाटनाची आशा

मेलबर्न, अमित चौधरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णाच्या थेट फुफ्फुसात इंजेक्शन

आॅस्ट्रेलिया व अमेरिकेतील संशाेधकांच्या हाती माेठे यश आले आहे. अलीकडेच झालेल्या एका प्रयाेगाचे निष्कर्ष संपूर्ण जगाला काेविडपासून मुक्त करण्याची नवी आशा निर्माण करणारे ठरले आहेत. आॅस्ट्रेलियातील क्विन्सलँड येथील ग्रिफिथ विद्यापीठातील मेंडिज हेल्थ इन्स्टिट्यूट व सिटी आॅफ हाेप रिसर्च अँड ट्रीटमेंट सेंटरने एका क्रांतिकारी थेरपीला विकसित केले आहे. या उपचार पद्धतीनुसार काेविड-१९ विषाणूला लक्ष्य करून त्याचा नायनाट करता येऊ शकताे, असा दावा आहे. ही पद्धती जनुकीय प्रणालीवर आधारित आहे. संशाेधक नायजेल मॅकमिलन यांच्या म्हणण्यानुसार आरएनए तंत्रज्ञानुसार शरीरातील काेविडच्या विषाणूचा ९९.९ टक्के नायनाट शक्य आहे. यासंबंधी उंदरावर एक प्रयाेग झाला.

त्यात उंदराच्या फुप्फुसात पसरलेल्या काेविड-१९ चा पूर्ण नायनाट करण्यात यश मिळाले. हा प्रयाेग करणाऱ्या संशाेधकांनी ‘सेल’ या नियतकालिकात याबद्दलचा लेख दिला आहे. प्रयाेगात सहभागी प्राेफेसर केविन माेरिस म्हणाले, या तंत्रज्ञामुळे काेविडच नव्हे तर भविष्यातील अनेक विषाणूंच्या प्रतिरूपांवरही अचूकपणे उपचार करता येईल. ही पद्धती सुलभपणे वापरता येणार आहे. त्याचे इंजेक्शन फ्रिजमध्ये केवळ ४ अंश सेल्सियस तापमानात आणि १२ महिने साठवता येते. म्हणूनच ग्रामीण भागात ते सहजपणे पाेहाेचवता येईल. क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्यावर ते बाजारात येईल. त्यासाठी दाेन वर्षे प्रतीक्षा करावी लागेल, असे प्राेफेसर मॅकमिलन यांनी सांगितले.

फुप्फुसात इंजेक्शन
संशाेधकांनी तयार केलेली आैषधी रुग्णाच्या थेट फुप्फुसात दिली जाते. ही आैषधी काेविडच्या जीनाेमाचा खात्मा करून त्याच्या संसर्गाला राेखण्याचे काम करते. त्यामुळे शरीराच्या राेग प्रतिबंधक पेशी विषाणूचा पूर्ण नायनाट करतात. त्यास डायरेक्ट अॅक्टिंग अँटी व्हायरल थेरपी म्हटले जाते. या काळात लिपिड नॅनाे पार्टिकलद्वारे फुप्फुसात आैषधी साेडतात. प्रयाेगात ९९.९ टक्के यश आले.

बातम्या आणखी आहेत...