आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Such Is The Effect Of Global Climate Change; Possibility Of 'heat Tax' In Future

दिव्य मराठी विशेष:जागतिक हवामान बदलांचा असाही परिणाम; आता भविष्यात ‘हीट टॅक्स’ लागण्याची शक्यता

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संशोधन : 1 अंश तापमानवाढीने उत्पादकता 2% कमी होते

अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठाने जागतिक हवामान बदलांशी संबंधित एका ताज्या अभ्यासाचे निष्कर्ष जारी केले आहेत. त्यात म्हटले आहे की, वार्षिक एक अंश सेल्सिअस तापमान वाढल्याने भारतासारख्या देशांतील मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधील उत्पादकता दोन टक्क्यांपेक्षा जास्त घटते. यामुळे या देशांतील लाेकांना ‘हीट टॅक्स’ (उष्णता कर) भरण्यासारख्या स्थितीलाही समोरे जावे लागू शकते.

विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटमध्ये द. आशिया विभाग संचालक डॉ. अनंत सुदर्शन म्हणाले, ‘उच्च तापमानाचा पिकांच्या उगवणक्षमतेवरील विपरीत परिणाम आधीच सिद्ध झालेला आहे. आता वाढते तापमान श्रम उत्पादकत कमी करण्यासोबतच इतर क्षेत्रांतील महसुलाचेही नुकसान करते, असे सिद्ध होत आहे. स्वस्त कामगारांचा वापर करून निर्मिती क्षेत्रात महाशक्ती व्हायचे असेल तर अत्यंत गंभीरपणे विचार करायला हवा. कामगारांना उष्ण वातावरणापासून वाचवण्यासाठी कमी खर्चातील तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्याची गरज आहे. तसेच ‘हीट टॅक्स’सारखी पावले उचलली तर यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील स्पर्धेला धक्का लागू शकतो. गरीब मजुरांच्या वेतनावरही नकारात्मक प्रभाव पडू शकतो.’

अध्ययनात ५८ हजारांवर मिल्स, कारखान्यांचा समावेश
डॉ. सुदर्शन या अध्ययनाचे मुख्य लेखक आहेत. दिल्लीतील भारतीय सांख्यिकी संस्थेचे ई. सोमनाथन, दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्सच्या रोहिणी सोमनाथन आणि युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनाच्या मीनू तिवारी सहलेखक आहेत. दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, सुरत, भिलाई, छिंदवाडासह देशभरातील ५८ हजारांवर कापड गिरण्या, शिलाई कारखाने, स्टील मिल व हिरा वर्कशॉपमधील उत्पादन व कामगारांच्या उत्पादकतेबाबत १५ वर्षांतील माहितीवरून हे अध्ययन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...