आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामानाची चंदेरी रेषा...:काश्मीरमध्ये अचानक बर्फवृष्टीने हवेत गारठा, मान्सून लीला : कुठे ओढ, कुठे दुप्पट पाऊस

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोसमी पावसाने रविवारी देशाचा ५०% भाग कवेत घेतला. विशेष म्हणजे मान्सून पोहोचल्यानंतर काही ठिकाणी दुप्पट पाऊस होत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, असाच ट्रेंड सुरू राहिल्यास देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. हवामानतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मान्सूनच्या पॅटर्नमध्ये काही वर्षांत एक मोठा बदल आला आहे. आधी जेवढा पाऊस एका महिन्यात होत होता, आता तो आठवड्यात होत आहे. सुरुवातीस रेंगाळत व्यापक क्षेत्रात पाऊस पडत होता. आता मर्यादित भागात खूप पाऊस होत आहे. हा वातावरण बदलाचा परिणाम आहे. उदाहरणार्थ तामिळनाडूत आतापर्यंत सरासरीपेक्षा ७२% जास्त पाऊस झाला आहे. केरळमध्ये ५७% कमी पाऊस झाला आहे. याच पद्धतीने मेघालयात सरासरीपेक्षा तिप्पट, आसाममध्ये दुप्पट जास्त पाऊस झाला आहे. शेजारी राज्य मणिपूरमध्ये अद्यापही २८% पाऊस कमी झाला.

स्कायमेट : पावसाचा अंदाज १२% वाढला हवामान संस्था स्कायमेटचे शास्त्रज्ञ महेश पलावत म्हणाले, मानसून जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात मध्य भारतात वेळेत पोहोचतो. या महिन्याच्या अखेरपर्यंत मानसूनचा पाऊस होत राहील. एप्रिल महिन्यात आमचा अंदाज होता की, जूनमध्ये ९८% पाऊस होईल, पण आता वाटत आहे की, ११०% पर्यंत होईल.

आसाममध्ये नुकसान सुरूच : पूर-भूस्खलनामुळे आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू. ४२ लाख लोक प्रभावित झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...