आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात २०२१ मध्ये प्रतिदिन ६३ गृहिणी आणि ११५ रोजंदारीवरील मजुरांनी आत्महत्या केली. मागील वर्षात आत्महत्या केलेल्यांचा आकडा १,६४,०३३ असल्याची माहिती मंगळवारी लोकसभेत देण्यात आली. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या हवाल्याने दिलेल्या माहितीत ४२,००४ मजुरांनी आणि २३,१७९ गृहिणींनी आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्यांमध्ये १३,७१४ बेरोजगार,१३,०८९ विद्यार्थी,१२,०५५ व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनी आत्महत्या केली. त्यात ११,४३१ खासगी क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे.याशिवाय देशात आयपीएसची ८६४ पदे रिक्त असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.