आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्राचे तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास शनिवारी ३८ दिवस पूर्ण झाले. दरम्यान, गाझीपूर सीमेवर कश्मीरसिंग नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले की, अखेर कुठपर्यंत आपण येथे थंडीत बसून राहणार, सरकार ऐकत नसल्याने जीव देत आहे, म्हणजे तोडगा निघेल. गाझीपूर सीमेवरच अंत्यसंस्कार करण्याचीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
७५ वर्षांचे कश्मीरसिंग सुरुवातीपासून मुलगा व नातवासोबत दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होते. त्रस्त होऊन शनिवारी त्यांनी आंदोलनस्थळी असलेल्या शौचालयात जाऊन फाशी घेतली. याआधी शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या सीमेवर ५५ वर्षांचे शेतकरी गलतानसिंग यांचा थंडीमुळे मृत्यू झाला होता. या आंदोलनात आतापर्यंत आत्महत्या व इतर कारणांनी ४० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे (बीकेयू-टिकेत) प्रदेशाध्यक्ष बिजेंद्र यादव यांनी कोणत्याही स्थितीत आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारकडून मान्य केल्या जाव्यात, अशी मागणी केली, तर केंद्राने कायदे रद्द केले नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संयुक्त किसान मोर्चाने दिला.
शेतकरी प्रजासत्ताकदिनी दिल्लीत काढणार परेड
कुंडली आणि टिकरी सीमेवरून ६ जानेवारीला ट्रॅक्टर मार्च काढला जाईल. १५ जानेवारीपर्यंत भाजप नेत्यांना घेराव घालण्यात येईल. नंतर २३ जानेवारीला राजभवनपर्यंत मार्च काढला जाईल. २६ जानेवारीला दिल्लीत शेतकरी प्रजासत्ताक परेड काढण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. दरम्यान,शेतकरी कुटंुबातील किमान एकाने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.