आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीच्या तुरुंगात कैदेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरने पुन्हा एकदा लेटर बॉम्ब टाकला आहे. सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून पत्र लिहून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. महाठक सुकेश चंद्रशेखरने केजरीवाल सरकार मुलांच्या शिक्षणातही घोटाळे करत असल्याचा आरोप केला आहे.
सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून पत्र लिहून अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यावर गरीब मुलांच्या शिक्षणात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. सुकेशने केजरीवाल सरकारवर टॅब्लेट घोटाळ्याचा आरोप केला आहे. सुकेशचा दावा आहे की, मुलांना टॅब्लेट वाटपासाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या मसुद्यात माझ्यामार्फत एका चिनी कंपनीकडून टॅब्लेट विकत घेतले जात होते.
केजरीवाल यांच्यावर 1000 कोटी कमिशन घेतल्याचा आरोप
सुकेश चंद्रशेखरने पत्रात आरोप केला आहे की, केजरीवाल सरकारने मला टेंडर देण्याऐवजी दुसऱ्या कंपनीने 20 टक्के जास्त कमिशन देण्याचे आमिष दिल्याने त्यांनी टेंडर दुसऱ्याला देण्याचा निर्णय घेतला. शाळेतील मुलांच्या स्टेशनरी आणि टेबलमध्येही घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. सुकेश चंद्रशेखरने अरविंद केजरीवाल यांच्यावर वेगवेगळ्या कराराद्वारे 1000 कोटी रुपयांचे कमिशन घेतल्याचा आरोप केला.
सुकेशचा दावा आहे की, 25 मार्च 2017 रोजी अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी त्याच्या वाढदिवशी 'ये दोस्ती हम नही छोडेंगे...' हे गाणे गायले होते, पण पैशाच्या लोभामुळे त्यांनी दिलेले वचन मोडले. सुकेश म्हणाला की, केजरीवाल मला ठग म्हणतात पण ते सर्वात मोठे घोटाळेबाज आहेत. एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात सरकारचे कौतुक करणारा लेखही मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी माझ्या माध्यमातून प्रकाशित केल्याचा सुकेशचा दावा आहे.
चतुर्वेदी हे जैन आणि केजरीवाल यांच्यासाठी काम करत असल्याचा दावा
सुकेशने आपल्या पत्रात लिहिले आहे की, ईडीने मला ताब्यात घेताच सत्येंद्र जैन यांचे हवाला ऑपरेटर चतुर्वेदी यांनाही समन्स बजावले आहे. चतुर्वेदी हे सत्येंद्र जैन आणि अरविंद केजरीवाल यांच्यासाठी काम करायचे, असा दावा सुकेशने आपल्या पत्रात केला आहे. चार दिवसांपूर्वी ईडीसमोर दिलेल्या जबाबात आपची, सत्येंद्र जैन आणि चतुर्वेदी यांची गुपिते उघड झाली होती. यानंतर सत्येंद्र जैन यांना मंत्रिपदावरून तत्काळ हटवले, पण 9 महिने हा निर्णय घेतला नव्हता.
नुकतीच सुकेशची तुरुंगात झाडाझडती
मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या मंडोली तुरुंगात बंद असणाऱ्या सुकेश चंद्रशेखरचा एक व्हिडिओ उजेडात आला आहे. त्यात त्याच्या बराकीत लग्झरी वस्तू दिसून आल्या आहेत. जवळपास 3 मिनिटांच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला सुकेश रडतानाही दिसत आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, सुकेशच्या तुरुंगात आढळलेले सामान पाहून अधिकारीही थक्क झाले होते. सुकेशकडे Gucci ची दीड लाख रुपयांची चप्पल व 80 हजार रुपयांच्या 2 जींस आढळल्या. धाड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे संपूर्ण सामान जप्त केले. दुसरीकडे, तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुरुंग प्रशासन सुकेश चंद्रशेखरचे सीसीटीव्ही फुटेज कुणी लिक केले याचा तपास करेल. त्या व्यक्तीवरही या प्रकरणी कारवाई केली जाईल. येथे वाचा सविस्तर वृत्त
कोण आहे सुकेश चंद्रशेखर?
सुकेश चंद्रशेखर हा कर्नाटकातील बंगळुरू येथील रहिवासी आहे. लक्झरी लाइफस्टाइल जगण्यासाठी त्याने वयाच्या 17व्या वर्षापासून लोकांची फसवणूक सुरू केल्याचे सांगितले जाते. बंगळुरूमध्ये फसवणूक केल्यानंतर त्याने चेन्नई आणि इतर शहरातील लोकांनाही टार्गेट केले. राजकारणी, उद्योगपतींपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत त्याचे लक्ष्य होते.
सुकेश चंद्रशेखर 2017 पासून मंडोली कारागृहात बंद आहे. मध्यंतरी त्याला तिहारला हलवण्यात आले. सुकेशने सत्येंद्र जैन यांच्याविरोधात उच्च न्यायालयातही तक्रार केली आहे. त्यावर पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे. आप सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन हेदेखील मनी लाँड्रिंग प्रकरणात 6 महिन्यांसाठी तिहार तुरुंगात आहेत.
सुकेश चंद्रशेखरशी संबंधित इतर बातम्या वाचा...
सुकेशला स्पेशल रुममध्ये भेटण्याचे मिळत होते 1.5 लाख:3 अभिनेत्री BMWतून 'तिहार'मध्ये जात होत्या, त्यांचा जबाबही थक्क करणारा
महाठग येथे वाचा संपूर्ण बातमी...
मला विवाहित महिलांमध्ये रस नाही:चाहत खन्नाच्या आरोपांवर सुकेश म्हणाला- ती एक खोटारडी आणि पैशांसाठी संबंध ठेवणारी आहे
सध्या तिहार तुरुंगात कैद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून पुन्हा एक पत्र लिहिले आहे. त्यात त्याने चाहत खन्नाचा उल्लेख करत लिहिले की, 'मला विवाहित किंवा मुले असलेल्या महिलांमध्ये रस नाही. मी चाहत खन्नासारखा गोल्ड डिगर (पैशांसाठी संबंध ठेवणारे) नाही. चाहत आणि निक्की तांबोळी यांच्यासोबत माझे संबंध केवळ व्यावसायिक कारणांमुळे होते.' येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.