आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sukesh Chandrashekhar On AAP Party Minister Satendra Jain Over Protection Money Update

ठग चंद्रशेखरचा दावा, सत्येंद्र जैन यांना 10 कोटी दिले:म्हणाला - तो प्रोटेक्शन मनी होता; आम आदमी पार्टीलाही केली 50 कोटींची फंडिंग

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात बंदिस्त असलेल्या सुकेश चंद्रशेखरने आम आदमी पार्टीचे मंत्री सत्येंद्र जैन यांना तब्बल 10 कोटी रुपयांची प्रोटेक्शन मनी दिल्याचा दावा केला आहे. सुकेशने दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांना पत्र पाठवून या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. सुकेश चंद्रशेखर 2017 पासून तिहार तुरुंगात बंदिस्त आहे. तर जैनही मनी लाँड्रिंगप्रकरणी तिहारमध्येच बंद आहेत.

मी सत्येंद्र जैन यांना 2015 पासून ओळखतो. मी त्यांना 10 कोटी रुपयांची प्रोटेक्शन मनी दिली. एवढेच नाही तर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीलाही तब्बल 50 कोटी रुपयांचा निधी दिला. या मोबदल्यात पक्षने मला दक्षिण भारतात पक्षाची महत्वाची जबाबदारी देण्याची ग्वाही दिली होती, असे सुकेश चंद्रशेखर याने म्हटले आहे.

सुकेशने सत्येंद्र जैनवर केले गंभीर आरोप

चंद्रशेखरने आपल्या पत्रात म्हटले आहे की, सत्येंद्र जैन, आम आदमी पार्टी व तुरुंग विभागाचे महासंचालक संदीप गोयल यांना करण्यात आलेल्या पेमेंट्सची संपूर्ण माहिती सीबीआयला देण्यात आली आहे. दिल्ली हायकोर्टात सीबीआय चौकशीसाठी याचिकाही दाखल केली आहे. सुकेशने जैन यांच्यावर धमकावण्याचाही आरोप केला आहे.

सुकेश आपल्या पत्रात म्हणाला - 2017 पासून मी दिल्लीच्या तुरुंगात बंदिस्त आहे. मी जैन यांना 2015 पासून ओळखतो. दिल्लीतील सत्ताधारी आपला मी 50 कोटींहून अधिकचा निधी दिला. त्यानंतर पक्षाने मला राज्यसभेवर घेण्याचे व दक्षिणेत मोठी जबाबदारी देण्याची ग्वाही दिली होती.

तुरुंगातील सुरक्षेसाठी दरमहा 2 कोटी

याच तुरुंगात सत्येंद्र जैन अनेकदा मला भेटण्यासाठी आले. त्यावेळी ते जेल मंत्री होते. त्यांनी मला ईडी चौकशीसंबंधीची विचारणा केली. 2019 मध्ये सत्येंद्र जैन मला भेटण्यासाठी पुन्हा आले. त्यांच्या सचिवांनी मला तुरुंगातील सुरक्षेसाठी दरमहा 2 कोटी रुपये देण्याचे सांगितले होते, असेही सुकेशने आपल्या पत्रात म्हटले आहे.

'2-3 महिन्यांतच माझ्यावर दबाव टाकून 10 कोटी उकळण्यात आले. ही रकम कोलकाता स्थित जैन यांचे निकटवर्तीय चतुर्वेदी यांच्यामार्फत देण्यात आले. मी सत्येंद्र जैन यांना 10 कोटी रुपये व डीजी संदीप गोयल यांना 12.50 कोटी रुपये दिले.'

सुकेशचा आरोप- सत्येंद्र जैनकडून धमक्या

सुकेश म्हणाला, 'ED ने नुकत्याच केलेल्या चौकशीत मी गोयल यांना देण्यात आलेले पैसे व जेल प्रशासनाच्या रॅकेटची माहिती दिली. मी दिल्ली हाय कोर्टातही याचिका दाखल करून सीबीआय चौकशीची मागणी केली. या प्रकरणी कोर्टाने नोटीस जारी करून पुढील महिन्यातील सुनावणीची तारीख दिली आहे. आता जैन दिल्लीच्या तिहार तुरुंगातच बंदिस्त असल्यामुळे डीजी जेल व तुरुंग प्रशासन मला सातत्याने धमकावत आहे. हे सर्वजम माझ्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. मला धमकावले जात आहे.'

सुकेशने दिल्लीच्या उपराज्यपालांना सीबीआयला निर्देश देऊन सत्येंद्र जैन व तिहार जेल तुरुंगावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आपली सत्येंद्र जैन यांच्याविरोधात पुरावे देण्याची तयारी असल्याचेही चंद्रशेखर याने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...