आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sukesh Chandrasekhar | Jackquline Fernandez | Mandoli Jail | Happy Hol | Holi Wish

ठग सुकेशच्या जॅकलिनला होळीच्या शुभेच्छा:तुरुंगातून लिहिले पत्र; म्हणाला -जॅकलिन तुझ्यासाठी कोणत्याही थराला जाईल

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे जॅकलिन व सुकेशचे अटकेपूर्वीचे छायाचित्र आहे. दुसरीकडे, सुकेशच्या पत्राचा फोटो आहे.  - Divya Marathi
डावीकडे जॅकलिन व सुकेशचे अटकेपूर्वीचे छायाचित्र आहे. दुसरीकडे, सुकेशच्या पत्राचा फोटो आहे. 

200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी तुरुंगात बंदिस्त असणाऱ्या सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसला पत्राद्वारे होळीच्य शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रात तो म्हणाला - मी सर्वात शानदार, अमेझिंग व ब्यूटिफुल व्यक्ती असणाऱ्या जॅकलिनला होळीच्या शुभेच्छा देतो. रंगाच्या या उत्सवात मी ग्वाही देतो की, जे रंग उडालेत किंवा गायब झालेत, ते 100 पटीने तुझ्याकडे परत येतील.

जॅकलिनला म्हणाला - तू माझ्यासाठी काय आहेस हे तुला माहिती आहे

सुकेशने या पत्राद्वारे जॅकलिनला विश केले आहे.
सुकेशने या पत्राद्वारे जॅकलिनला विश केले आहे.

सुकेशने लिहिले की, 'सर्वप्रथम मी माझी बाजू मांडणाऱ्या मीडियातील माझ्या मित्रांचे आभार मानतो.'

त्यानंतर जॅकलिनला उद्देशून म्हणाला - बेबी गर्ल मी तुझ्यासाठी कोणत्याही थराला जाईल हे तुला चांगलेच ठावूक आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. सदैव हसत रहा. माझ्यासाठी तू काय आहेस हे तुला चांगलेच माहिती आहे. लव्ह यू माय प्रिंसेस. माझी बेबी, मेरी बोम्मा, माझे प्रेम, माझी जॅकी, मला तुझी खूप आठवण येते.

शत्रूंनाही शुभेच्छा, पत्रात पत्ता मंडोली तुरुंगाचा लिहिला

सुकेशने कुटुंबीय, समर्थक, मित्र, हेटर्स, शत्रू व आपल्या विधी सल्लागारांनाही होळीच्या शुभेच्छा दिल्यात. हे पत्र सुकेशने आपल्या वकिलामार्फत पाठवले आहे. त्यात त्याने मंडोली तुरुंगाचा पत्ता लिहिला आहे. सुकेशने यापूर्वी व्हॅलेंटाइनच्या दिवशी जॅकलिनला विश केले होते.

सुकेश चंद्रशेखरशी संबंधित खालील बातम्या वाचा...

मी जॅकलिनला सोडावे अशी नोराची इच्छा होती:महाठग सुकेशचे नवे पत्र व्हायरल; वाचा नोरा, जॅकलिन, निक्की तांबोळीविषयी काय म्हणाला

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी गजाआड असणाऱ्या सुकेश चंद्रशेखरने सनसनाटी दाव्यांचे आणखी एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्याने अभिनेत्री नोरा फतेही व जॅकलिन फर्नांडिजच्या वादावर भाष्य केले आहे. तो म्हणाला की - 'नोरा फतेहीने आर्थिक गुन्हे ब्यूरोपुढे (EOW) आपला जबाब बदलला. मी जॅकलिनला सोडावे असे नोराला वाटत होते. मी नकार दिल्यानंतर ती मला नाहक त्रास देत होती.' येथे वाचा संपूर्ण बातमी...

सुकेशला स्पेशल रुममध्ये भेटण्याचे मिळत होते 1.5 लाख:3 अभिनेत्री BMWतून 'तिहार'मध्ये जात होत्या, त्यांचा जबाबही थक्क करणारा

महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणात यापूर्वीच जॅकलिन फर्नांडीस व नोरा फतेही या दोन अभिनेत्रींचे नाव आले आहे. त्यानंतर आता या प्रकरणात आणखी एका हिरोईनचे नाव समोर आले आहे. ही हिरोईन वारंवार सुकेशला भेटण्यासाठी तिहार कारागृहात जात होती. 'नवभारत टाइम्स'च्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी 200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी सुकेश चंद्रशेखर विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा दावा केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...

मला विवाहित महिलांमध्ये रस नाही:चाहत खन्नाच्या आरोपांवर सुकेश म्हणाला- ती एक खोटारडी आणि पैशांसाठी संबंध ठेवणारी आहे

सध्या तिहार तुरुंगात कैद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून पुन्हा एक पत्र लिहिले आहे. त्यात त्याने चाहत खन्नाचा उल्लेख करत लिहिले की, 'मला विवाहित किंवा मुले असलेल्या महिलांमध्ये रस नाही. मी चाहत खन्नासारखा गोल्ड डिगर (पैशांसाठी संबंध ठेवणारे) नाही. चाहत आणि निक्की तांबोळी यांच्यासोबत माझे संबंध केवळ व्यावसायिक कारणांमुळे होते.' येथे वाचा संपूर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...